Subscribe Us

येडशी जि प गटातून ॲड धनंजय धाबेकर प्रबळ दावेदार


 
तेरणेचा छावा/धाराशिव:-
जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसेच इच्छुकांची संख्याही वाढू लागली असून अनेकांच्या नावाची चर्चा ऐकावयास येऊ लागली आहे.
   जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी ,महायुती की आणखी नगरपालिकेसारखी स्थानिक पातळीवर वेगळीच सोयीनुसार गठबंधन होते हे आणखी ठरलेले नाही. 
        जिल्हा परिषद येडशी गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव (ओबीसी पुरुष) असून येथून तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक ॲड धनंजय धाबेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. 
  ॲडवोकेट धनंजय धाबेकर हे विद्यार्थी दशेपासून सामाजिक चळवळीत सक्रिय असून प्रबोधनाच्या माध्यमातून चळवळीतून त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झालेला आहे.अनेक गरीब व गरजवंत युवकांना शालेय स्तरावर शिक्षणासाठी पूर्णपणे सहकार्य केलेले असून व्याख्यानाच्या माध्यमातून मोठी लोक चळवळ उभारत  जनजागृती करण्याचेही काम त्यांनी केलेले आहे. 
     परंडा मतदार संघात आ.तानाजी सावंत यांच्या प्रचारात सक्रिय राहुन स्टार प्रचारकाची जबाबदारी पार पाडली होती. आ. तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. येडशी जिल्हा परिषद गटात त्यांचा दांडगा जनसंपर्क सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यामुळे त्यांच्या नावाची मोठी चर्चा मतदारसंघातून एकावयात येत आहे.
   धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसाठी आ. तानाजी सावंत यांनी लक्ष घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यामुळे आ.तानाजी सावंत यांनी विजयी संकल्प मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करण्यास सुरुवात केलेली असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्य नवचैतन्याचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
    ॲड.धनंजय धाबेकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे मात्र राजकीय गणित बदलण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments