.
तेरणेचा छावा/धाराशिव:-
दहिफळ ता.कळंब येथील महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष, शिवसेनेच्या दोन माजी उपसरपं, युवा कार्यकर्त्यांसह अनेकांचा आ.राणाजगजितसिंह पाटलांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.
गेल्या अनेक दिवसापासून दहिफळ येथे राजकीय गटात धुमसुम चालू होती अनेक वेगवेगळ्या वावड्या उठल्या होत्या.कोण कुठे प्रवेश करणार तर कोण कोणत्या पक्षात जाणार याविषयी गेल्या दोन-तीन दिवसापासून गावात मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू होत्या, प्रस्थापित नेतेमंडळी सत्ताधारी मंडळीच्या संपर्कात असून प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चेला मोठं उधान आलं होतं.रोज नवनवीन चर्चा ऐकावयास येत होत्या परंतु चर्चा एका गटाच्या पण प्रवेश दुसऱ्याच गटान केला त्यामुळे फटाका दुसरीकडे फुटला आवाज मात्र तिसरीकडे आला अशीच अवस्था झाली आहे.
प्रवेशामध्ये काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष अंजली ढवळे,शिवसेनेचे मा.उपसरपंच बालाजी मते, नारायण भातलवंडे शिवसेनेचे युवा नेते अमर भातलवंडे,दादा ढवळे, विवेक भातलवंडे,तानाजी मते,रामचंद्र मते महेश काकडे,मनोज खंडागळे खंडागळे यांच्यासह 50 जणांनी भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती धनंजय वाघमारे, भाजपा जिल्हा युवा समन्वयक दिनेश बंडगर, प्रशांत मते,भगवान मते, किरण भातलवंडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments