Subscribe Us

प्रशासनातील अनुभव व व्यापक संपर्कामुळे कसबे तडवळे गणात भारत लोंढेंचा वरचष्मा ; भाजपसाठी ठरणार निर्णायक फॅक्टर


तेरणेचा छावा/धाराशिव:-
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे पंचायत समिती गण सध्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. या गणातून भारतीय जनता पार्टीकडे सौ. ऋतुजा भारत लोंढे यांनी उमेदवारीची ठाम मागणी केली असून, भाजपमधील जिंकाऊ उमेदवारांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.
   सौ.ऋतुजा भारत लोंढे या भाजपचे प्रभावी व अनुभवी नेते भारत लोंढे यांच्या पत्नी असून, भारत लोंढे यांचा जनसंपर्क, प्रशासनातील अनुभव आणि विविध पातळ्यांवरील संपर्क हे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. विकासकामे, लोकांच्या प्रश्नांवरील पाठपुरावा आणि प्रशासनाशी असलेला समन्वय यामुळे त्यांची ओळख ही “ काम करून घेणारा नेता ” अशी निर्माण झाली आहे.
प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांशी असलेला त्यांचा दीर्घकाळचा संपर्क, कामाची पद्धत आणि प्रश्न मांडण्याची ठाम शैली यामुळे अनेक विकासकामांना गती मिळाल्याचे समर्थक सांगतात. हीच प्रशासनावरची पकड आणि अनुभव सौ. ऋतुजा भारत लोंढे यांना निवडणुकीत फायदा करून देईल, असा विश्वास स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
भारत लोंढे यांनी यापूर्वी निवडणूक लढवलेली असून, भाजपमधील सर्व स्तरांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. विशेष म्हणजे इतर पक्षांतील अनेक नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे निवडणुकीत व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जर भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, तर भारत लोंढे पुढील काही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेणार असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यांच्या भूमिकेचा थेट परिणाम कसबे तडवळे गणाच्या राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी स्थानिक परिस्थिती, जनभावना आणि भारत लोंढे यांचा प्रभाव लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता उघडपणे व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments