Subscribe Us

दारूबंदीसाठी महिलांचा आक्रमक पवित्रा, रणरागिनींची ग्रामपंचायतवर धडक


   
तेरणेचा छावा/दहिफळ:-
गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी या मागणीसाठी दहिफळ ता. कळंब या गावातील शेकडो महिला मंगळवार (दि.23डिसेंबर)रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर  धडकल्या.
    याविषयी सविस्तर वृत्त असे की दहिफळ येथे पाच बियर बार एक बियर शॉपी एक देशी दारू दुकान यांचा परवाना आहे,तसेच नवीन बियर बार,सांस्कृतिक कला केंद्र,डान्सबार साठी काही जन परवानगी मागत असल्याची कानकून लागतात महिलांनी अंजली ढवळे यांच्या नेतृत्वाखाली नवीन परवाना देण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन घेऊन ग्रामपंचायतवर धडक मारत सरपंच व ग्रामसेवकाकडे सुपूर्द केले. परंतु येथे आल्यानंतर सर्वच महिला संपूर्ण गावातील दारूबंदी व्हावी या मागणीसाठी जोर वाढला यानंतर महिलांनी संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी या मागणीचे दुसरे निवेदन ग्रामपंचायतला दिले.यासाठी कल्पना मते व मनीषा मते या महिलांनी पुढाकार घेतला.व संपूर्ण महिलांनी पाठिंबा दिला. 
    यावेळी दारूमुळे गावात लग्न जमेना,पाहुणा येईना, शाळेतील विद्यार्थी ही व्यसनाधीन होऊ लागलेत, व्यसनामुळे अपघात,अकाली आजारपण येऊन मोठी शारीरिक व आर्थिक हानी होत गावचं नाव बदनाम होत आहे. त्यामुळे संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी. अशा प्रकारचा आक्रोश महिलांनी ग्रामपंचायत समोर केला. संपूर्ण दारूबंदीच्या मागणीसाठी जवळजवळ 81 महिलांनी लेखी निवेदन ग्रामपंचायतला सादर केले आहे. काही महिला ग्रामपंचायतवरच उपोषण करण्याचा इशारा बोलून दाखवत होत्या. निवेदनावर रत्नमाला रामेश्वर भातलवंडे, अश्विनी गोपीनाथ मते, वंदना दत्तात्रय मते, विद्या सतीश मते, सोनाली तानाजी वरपे, सोनाली ज्ञानेश्वर कुटकर ,सलीमा नजीर शेख, सुमन अशोक गोरे, सुरेखा श्रीकांत गोरे, मंगल बब्रुवान माने ,उषा वाल्मीक माने, शारदा अरुण भातलवंडे, वच्छला वैजनाथ भातलवंडे, सरस्वती धर्मराज फराडे पार्वती शंकर भातलवंडे ,नंदूबाई वसंत भातलवंडे, लता नारायण भातलवंडे, शामल बाबू शेख, सुनीता अनिल चव्हाण, भाग्यश्री श्याम माने, माधुरी राहुल भातलवंडे,सुषमा बबन मते सह 81 महिलांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.
    यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुदर्शन मडके यांनी महिलांचे निवेदन स्वीकारत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, याप्रसंगी उपसरपंच अभिनंदन मते ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भातलवंडे, नामदेव खंडागळे, वसंत धोंगडे ,समाधान मते, प्रशांत भातलवंडे, गणेश भातलवंडे, संजय भातलवंडे गोपीनाथ मते, बापूराव भातलवंडे सह ग्रामस्थांनी व महिलांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments