Subscribe Us

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून वाघमारे दाम्पत्याची उमेदवारी ; समर्थकांकडून आर्थिक सहकार्याची विनंती..!


धाराशिव/तेरणेचा छावा:-

धाराशिव शहर नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून सौ. सुरेखा नामदेव वाघमारे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर प्रभाग क्रमांक ६ मधून नामदेव बाबुराव वाघमारे नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरले आहेत. सामाजिक क्षेत्रात २००१ पासून विविध संघटनांमधून कार्यरत असलेल्या नामदेव वाघमारे यांनी आतापर्यंत वैयक्तिक स्वार्थ न बाळगता आपला वेळ व पैसा समाजकार्यासाठी खर्च केल्याचे सांगितले.
     दीर्घकाळ सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे स्वतःजवळ निवडणूकीच्या खर्चासाठी पैसे उरले नसल्याने निवडणुकीतील खर्चासाठी नागरिकांकडून कमीतकमी १०० ते १००० रुपयांच्या सहकार्याची विनंती त्यांनी केली आहे. आपण दिलेले प्रत्येक रुपयाचे सहकार्य ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. असे आवाहन करताना त्यांनी पारदर्शकतेवर भर दिला.
     धाराशिव शहरातील मतदारांनी त्यांना तसेच त्यांच्या पत्नीला मतदान करून किंवा इतरांना मतदानास प्रवृत्त करून सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या मदतीसाठी फोन पे / गुगल पेद्वारे मो.नं. ८६२३८३५६२२ या क्रमांकावर सहकार्य स्वीकारले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली असून, रक्कम पाठवल्यानंतर त्याचा पुरावा व्हाट्सअपवर पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments