Subscribe Us

तेरणेचा छावा बातमीचा इफेक्ट पाईप लाईन तात्काळ दुरुस्त


तेरणेचा छावा/दहिफळ:-
  येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या 2 महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याच्या कारणावरून मंगळवार दि.25 नोव्हेंबर पर्यंत नळाला पाणी न आल्यास बुधवार दि.26 नोव्हेंबर म्हणजे चंपाषष्ठी (सटीच्या) यात्रेच्या दिवशी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला होता. 
      ही बातमी तेरणेचा छावा ऑनलाइन वर शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशित होतात ग्रामपंचायत प्रशासनाचे तारांबळ उडाली व त्यांनी तात्काळ तेरणेचा छावाशी संपर्क साधून आम्ही हे काम यात्रेच्या आधी पूर्ण करणार आहोत.तसेच हे पाईपलाईन दुरुस्तीचे काम वार्ड क्रमांक 4 मधील पाईपलाईन अतिवृष्टी मुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊ लागल्याने चर खोदत असताना पाईपलाईन जरी फुटली तरी  नागरिक घरपट्टी जमा करून करणार दुरुस्तीचे काम करून घेऊ पण चर खोल खांदा असे सांगितल्यामुळे साहजिकच ते दुरुस्ती करतील व आमच्याकडे घरपट्टी झालेल्या खर्चाची पावती मागतील यामुळे आम्ही या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.आता मोर्चाचे निवेदन आले परंतु यात्रेच्या आधी आम्ही हे काम करणारच होतो. आता तात्काळ काम करू असेही त्यांनी सांगितले होते.याविषयी आमच्याही प्रतिक्रिया घ्यावयाच्या अपेक्षित होत्या असेही नाराजी त्यांनी आम्हास बोलून दाखवली होती.
    काही का असेना परंतु तेरणेचा छावाच्या बातमीमुळे तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती झाली व आमच्या नळाला पाणी येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत तेरणेचा छावाचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments