तेरणेचा छावा/ दहिफळ:-
ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेतील येथील मुख्य धार्मिक कार्यक्रम आगळा बगाडा मिरवणूक कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी मानाचे बैल व रथावर घंटी वाजवण्यासाठी मानकऱ्याचा लिलावाचा कार्यक्रम रविवार (दि. 23 नोव्हेंबर) रोजी सकाळी 10:00 श्री खंडोबा मंदिरासमोर मोठ्या उत्साहात पार पडला.
आगाडा बगळा (दगडी चाके असलेला रथ 6ते8बैल जोडीने ओढण्यात येतो) मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यात येतात. पहिल्या प्रदक्षिणेसाठी भागवत कदम यांची बैल जोडी व रथावर घंटी वाजवण्यासाठी अशोक मते दुसऱ्या प्रदक्षिणेसाठी विनोद भातलवंडे यांचे बैल जोडी तर घंटी वाजवण्यासाठी अभिषेक मते, तिसऱ्या प्रदक्षिणेसाठी तुकाराम भातलवंडे यांची बैलजोडी तर रथावर घंटी वाजवण्यासाठी सागर मते चौथ्या प्रदक्षिणेसाठी बालाजी भातलवंडे यांची बैलजोडी तर रथावर घंटी वाजवण्यासाठी अभिषेक मते पाचव्या प्रदक्षिणेसाठी अशोक पौळ सापनाईकर यांची बैल जोडी तर रथावर घंटी वाजवण्यासाठी अक्षय हावळे यांची वार बोली लावून निवड करण्यात आली.
यात्रा कमिटीने आयोजित केलेल्या या वारबोली कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी व पंचकोशीतील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
0 Comments