Subscribe Us

ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेदिवशीच घागर मोर्चा,निष्क्रिय ग्रामपंचायतचा पर्दाफाश!


तेरणेचा छावा/दहिफळ:-
     येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या 2 महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याच्या कारणावरून वार्ड क्रमांक 4 मधील महिला व नागरिक बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामपंचायतकडे देण्यात आले आहे.
   याविषयी सविस्तर वृत्त असे की गेल्या 2 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे वार्ड क्रमांक 4 मध्ये नळाला पाणी येत नाही. याविषयी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाकडे तोंडी सांगूनही याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून 25 नोव्हेंबर पर्यंत पाईपलाईन दुरुस्त न केल्यास चंपाषष्ठी यात्रेदिवशीच ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वार्ड क्र. 4 मधूनच विद्यमान सरपंच बहुमताने विजयी झालेले असतानाही या वार्डाकडे कशासाठी दुर्लक्ष केले जात आहे .याविषयी नागरिकांतून वेगवेगळ्या चर्चा ऐकावयास आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या अनेक गावात समस्या असतानाही गावात फक्त कागदोपत्री ताळमेळे घातल्याच्या अनेक घटना आहेत. ग्रामपंचायत ही गावकऱ्यासाठी आहे का सरपंच ,सदस्यासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत, कारण ग्रामपंचायतकडे एखाद्या नागरिकाचे काम असेल तर ग्रामपंचायत बंदच असते. सरपंच ,ग्रामपंचायत सदस्याचे काम असेल तर ते तालुक्याच्या ठिकाणी व इतर ठिकाणी जाऊन ग्राम विस्तार अधिकाऱ्याची भेट घेतात.येथे  कायमस्वरूपी ग्रामविस्तार अधिकारी नसल्यामुळे येथे तात्पुरता चार्ज देण्यात आले आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे.त्यामुळे वरिष्ठांनी तात्काळ लक्ष घालून कायमस्वरूपी अधिकारी देऊन येतील नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी ही मागणी ग्रामस्थातून होत आहे. सोशल मीडियातून ही ग्रामपंचायतमधून झालेल्या भ्रष्ट  कारभाराची सविनय चर्चा ग्रामस्थातून व परिसरातून मोठ्या प्रमाणात ऐकावयास येत आहे. तसेच अनेक शासकीय योजनेचे लाभार्थी कुटुंब तेच ते कसे काय आहेत असाही प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.
    ग्रामदैवत यात्रे दिवशी नागरिकांना ग्रामपंचायतवर मोर्चा काढावा लागतो यावरूनच ग्रामपंचायतची निष्क्रियता दिसून येत आहे.
   निवेदनावर प्रशांत भातलवंडे, राणी प्रशांत भातलवंडे, वैशाली विनोद भातलवंडे, रेशमा किरण भातलवंडे, अंजली दिलीप कदम, दिलीप विश्वनाथ कदम, विकी हरणे ,बापू कासार, राजेंद्र विश्वंभर पुरी, विशंभर भगवान पुरी, सुदर्शन बिबीशन ढवळे सुभाष बापूराव ढवळे, अन्नपूर्णा सुभाष ढवळे, लीलावती धर्मराज ढवळे, बालाजी विश्वनाथ भातलवंडे, शहाजी शिवाजी ढवळे, विश्वनाथ अरुण मते, यांच्यासह 50 ग्रामस्थांच्या  स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments