Subscribe Us

धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची बैठक उत्साहात संपन्न.



नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा 
 महाविकास आघाडी करून लढण्याचा निर्धार 

तेरणेचा छावा/धाराशिव:- 
नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची पहिली बैठक 'वेदबाग निवासस्थानी' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हाध्यक्षपदाच्या बदलानंतर झालेल्या या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि नवचैतन्य पाहायला मिळाले. महाविकास आघाडी करूनच सर्वांनी लढाव अशी इच्छा सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बोलून दाखवली.
       या बैठकीला शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध प्रभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खलिफा कुरेशी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच विविध प्रभागांमधून जवळपास ६० इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी आपली मागणी जिल्हा नेतृत्वासमोर मांडली.
     बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपली रोखठोक मते मांडली व पक्ष नेतृत्वाने आगामी काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शेखर घोडके, इस्माईल शेख, रवि ठेंगल, आणि ॲड. योगेश सोन्ने-पाटील यांनी आपली मते मांडली.
       ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “आगामी निवडणुकांसाठी सर्व अर्थाने तयार राहा, पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “कार्यकर्ता सक्षम झाला तरच पक्ष सक्षम होईल. कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचा श्वास आहे. आगामी काळात प्रत्येकाला पक्षाच्या गरजेनुसार जबाबदारी दिली जाईल आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे राहू. ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो त्या ठिकाणी महाविकास आघाडीतून ती जागा आपल्याकडे कशी राहील या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे निश्चितपणे प्रयत्न केले जातील असेही डॉ.पाटील यांनी सांगितले. 
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष आयाज शेख यांनी केले. बैठकीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने पक्ष मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
 या बैठकीतून धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
      बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश प्रतिनिधी मसूद शेख, तालुकाध्यक्ष श्याम घोगरे, शहराध्यक्ष आयाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान पठाण, वाजेद पठाण, माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉ. सेल जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, नगरसेवक बाबा मुजावर, इस्माईल शेख, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, युवक शहराध्यक्ष रणवीर इंगळे, ज्योती माळाळे, अमोल सुरवसे, युवक प्रदेश सचिव आदित्य पाटील, प्रदेश सचिव रोहित बागल, युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकज भोसले, लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. योगेश सोन्ने-पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष दत्ता पवार, उपाध्यक्ष रवि ठेंगल, लीगल सेल कार्याध्यक्ष अविनाश जाधव, तसेच मृत्युंजय बनसोडे, गजानन खर्चे, सुरज वडवले, अस्लम शेख, ज्ञानेश्वर निंबाळकर, गयास मुल्ला, अभिजीत काळे, मजर शेरीकर, एजाज काझी, अजिंक्य हिबारे, सरफराज कुरेशी, अनवर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments