तेरणेचा छावा/येरमाळा:-
येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयाच्या इयत्ता दहावी (सन 2000-2001) च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी येथील आनंदधाम विठ्ठल रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री आबासाहेब बारकुल शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल प्राचार्य सुनील पाटील डी आर बारकुल सर, पी एम बारकुल, संभाजी गिड्डे, एस एल पौळ, ए टी पोळ, हनुमंत कोठावळे , सतीश पाटील, डी.बी मोरे, बापूराव चांदणे, एस पी पाटील, यादव सर, अनिल शिंदे, चव्हाण सर, देशमुख सर, आदी उपस्थित होते
या कार्यक्रमात एकूण 60माजी विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यामध्ये 48 मुले आणि १२ मुलींचा सहभाग होता. दोन दशकांहून अधिक काळानंतर पुन्हा एकत्र येण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. सभागृहात जुन्या आठवणींची उजळणी, हशा, गप्पा आणि भावना यांचा मिलाफ झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानोद्योग विद्यालयाच्या प्रांगणात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली
सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख, त्या काळातील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील किस्से सांगून वातावरण हलकंफुलकं आणि आनंदी केलं. अनेकांनी आपल्या आयुष्यातील प्रगतीचा प्रवास सांगताना ज्ञानोद्योग विद्यालयाने दिलेल्या संस्कारांची आणि शिक्षणपद्धतीची आठवण काढली.काहींनी आपल्या वर्गशिक्षकांबद्दल आणि मित्रमैत्रिणींबद्दल भावनिक आठवणी शेअर केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी मंडळ यांनी एकत्रितपणे केले होते. शेवटी सर्वांनी एकत्र भोजन घेत जुनी दोस्ती पुन्हा दृढ केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कोकाटे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहू बारकुल यांनी केले तर आभारप्रदर्शन विलास बारकुल व सुखदेव गायके यांनी केले.
एकूणच, हा गेट-टुगेदर केवळ आठवणींचा सोहळा नव्हता, तर शाळेने दिलेल्या संस्कारांचा आणि स्नेहबंधांचा पुनरुज्जीवनाचा उत्सव होता.यावेळी इयत्ता 10 दहावीच्या सन 2000 - 2001 च्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून ज्ञानोद्योग विद्यालय निधी एकत्र करून बारा डायस भेट देण्यात आले
0 Comments