Subscribe Us

दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,आरोग्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर


तेरणेचा छावा/धाराशिव:-
     धाराशिव जिल्ह्यात केल्या चार-पाच दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच पिके धोक्यात आली असून अनेक तलाव फुटले , शेकडो जनावरे वाहून गेली, एक महिला मृत्युमुखी पडली तर अनेक जण पावसाच्या पाण्यामुळे असतील तिथेच अडकून पडले, कित्येक जणाचे संसार खाण्यापिण्याच्या वस्तू, धान्य, जनावरांची कडव्याच्या गंजीच्या गंजी पाण्याबरोबर वाहून गेल्या,अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टर व एन डी आर एफ च्या  टीमने सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम चालूच आहे,शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली, वाहून गेली कोंबड्याचे पोल्ट्री फार्म वाहून गेले, जमिनी खरकटून वाहून गेल्या, अनेक ठिकाणी रोड, पूल, मोठमोठी झाडे वाहून गेली. अशा महाप्रलयकारी पावसामुळे जिल्ह्यावर मोठे संकट आले आहे.
    या सर्व विदारक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार, परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे सर्वजण बुधवार (दि. 24 सप्टेंबर)रोजी धाराशिव जिल्ह्याची महाप्रलयकारी पावसामुळे झालेली विदारक स्थिती पाहण्यासाठी व जनतेला मदत करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
हा दौरा परंडा भूम कळंब असा असणार आहे. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा दौरा
सकाळी १०.४५ वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने परांडा हेलिपॅड, जि. धाराशिवकडे प्रयाण सकाळी ११.१० वा.परांडा हेलिपॅड, जि. धाराशिव येथे आगमन व राखीव सकाळी ११.१५ वा.धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा
स्थळ :- रुई, ता. परांडा, जि. धाराशिव
दुपारी ०१.१५ वा.धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा स्थळ :- मौजे पाध्रुड, ता. भूम, जि. धाराशिव दुपारी ०३.०० वा.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा स्थळ :- मौजे आथर्डी, ता. कळंब, जि. धाराशिव मोटारीने कळंब हेलिपॅड, जि. धाराशिवकडे प्रयाण सायं. ०५.०० वा.कळंब हेलिपॅड, जि. धाराशिव येथे आगमन व हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण
तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दौरा ०७.१५ कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर ०९.४५ मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर ११.३० लांबोटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर दुपारी धाराशिव जिल्हयातील पूरपरिस्थिती पाहणी दौरा (तुळजापूर धाराशिव भूम)
१२.४५ वालवड, ता.भूम, जि. धाराशिव ०२.०० राखीव (परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव)०३.४५ देवगाव, ता. परांडा, जि.धाराशिव
सायं. ०५.०० पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव बीड जिल्हयातील पूरपरिस्थिती पाहणी दौरा 06.00 पिंपळगाव घाट, ता.बीड रात्रौ नंतर
मोटारीने प्रयाण शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन व मुक्काम.
    अशाप्रकारे दोन उपमुख्यमंत्री व दोन कॅबिनेट मंत्री धाराशिव जिल्हा दौरा करणार असल्याने यांच्या दौऱ्याकडे जिल्हावाशियांच्या मोठ्या आशेने नजरा लागलेले आहेत. कारण दौरा झाल्यानंतर तरी मोठ्या प्रमाणात मदत मिळेल याच्या आशा उंचावलेले आहेत.

Post a Comment

0 Comments