तेरणेचा छावा/येरमाळा:- येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, येरमाळा येथे शनिवार (दि.9 ऑगस्ट) रोजी सकाळी 11 वाजता रक्षाबंधन सणानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यसनमुक्तीचा उपचार घेत असलेल्या परिवर्तनवादी मित्रांच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ नयेत व त्यांना बहिणीच्या प्रेमळ सान्निध्याची आठवण सुखद अनुभवता यावी, या उद्देशाने महिला कर्मचारीवर्गाने सर्व परिवर्तनवादी मित्रांना प्रेमाने राखी बांधून सण साजरा केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्राचे व्यवस्थापक बापूराव हुलुळे यांनी केले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी गणपतसिंग परदेशी यांनी करताना सणाचे सामाजिक व मानसिक महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने बंधुत्व, आपुलकी आणि नात्यांमधील संवेदनशीलतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी समुपदेशक सागर शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.
या विशेष उपक्रमाला 100 हून अधिक परिवर्तनवादी मित्र व कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त उपस्थिती लावली. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वी व भावनिक वातावरणात पार पडला
सर्व परिवर्तनवादी मित्रांनी रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने एक शपथ घेतली व आपल्या बहिणीला वचन दिले इथून पुढची रक्षाबंधन ही निर्व्यसनी राहून ओवाळणी टाकीन
0 Comments