Subscribe Us

व्ही पी शैक्षणिक संकुलात विभाजन विभिषिका दिन साजरा


तेरणेचा छावा/धाराशिव:-
   व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव  येथे  डॉ. प्रतापसिंह पाटील व  करण प्रतापसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई जनविकास आय टी आय मध्ये विभाजन विभिषिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
      सर्व प्रथम राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. 14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी आता दरवर्षी  म्हणजेच 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो . देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जातो. हा दिवस फाळणीच्या काळात अनेक भारतीयांच्या दुःखाचे स्मरण करतो. फाळणीत असंख्य कुटुंबे विस्थापित झाली तसेच लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीयांना सामाजिक विभागणी, विसंगती दूर करण्याची आणि एकता, सामाजिक समरसता आणि मानवी सबलीकरणाची भावना अधिक बळकट करण्याच्या गरजेची आठवण करून देणे हा या दिवसाचा हेतू आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. क्रांतिकुमार पाटील केले.
     यावेळी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील,प्राचार्य अमरसिंह कवडे, निदेशक एस. एस. भोरे, निदेशक एस. एस. सुतार,निदेशक एस.आर.पुदाले, डी. एम. घावटे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments