संग्रहचित्र
तेरणेचा छावा/धाराशिव:- मौजे कदेर व सेवानगर तांडा कदेर येथे चालु असणारे अवैध दारू विक्री, जुगार धंदे त्वरीत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे कदेर ग्रामस्थांचे वतीने सामाजिक कार्यकर्ते रोहित चव्हाण, आकाश राठोड, शरद आडे, सुमित चव्हाण, सचिन चव्हाण व तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे यांनी दि. 02/08/2025 रोजी सकाळी 11:00 वा. चे सुमारास कर व सेवानगर तांडयातील महिला व पुरूष यांची स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस ठाणे उमरगा येथे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांचे कार्यालयात दिले होते.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि. 02/08/2025 रोजी संध्याकाळी अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी अवैध धंदयाची माहिती काढत पेट्रोलिंग करत कर मोड येथे आले असता पो.नि. अश्विनी भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सेवानगर तांडा येथे वसंत गोपा राठोड, शिवाजी चंदु राठोड हे त्यांचे घरासमोर अवैधरीत्या गावठी हातभट्टी दारू विकत असल्याची तसेच सेवानगर तांडा कर येथे गुलाब चव्हाण यांचे घरासमोर 8 जण मिळुन तिर्रट जुगार खेळत आहेत तसेच कदेर शिवारात लक्ष्मी मंदिर समोरील मोकळया जागेत 6 जण मिळुन तिर्रट पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पो. नि. अश्विनी भोसले व त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह सेवानगर तांडा येथे जावुन वसंत गोपा राठोड याचेवर छापा मारून त्याचे ताब्यातुन 6500 रू. किमतीचे 65 लीटर गावठी हातभट्टी दारू व शिवाजी चंदु राठोड याचेवर छापा मारून त्याचे कब्जातुन 7000 रू. किमतीचे 70 लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त करून त्यांचेविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल केला. तसेच सेवानगर तांडा कदेर येथील गुलाब चव्हाण यांचे घरासमोर छापा मारून तिर्रट जुगार खेळणारे 1 ) रोहित राजेंद्र चव्हाण रा. कदेर तांडा, 2) आकाश दिलीप राठोड रा.कदेर तांडा, 3) अशोक निळकंठ पवार रा. औराद तांडा, 4) गुलाब भिल्लु चव्हाण रा. कदेर तांडा, 5) अनिकेत भगवान राठोड रा. कदेर, 6) कमलाकर हिरा जाधव रा. अंबरनगर मुरूम, 7) अजय विठ्ठल पवार रा. औराद तांडा, 8) जयसिंग लालु राठोड रा. कदेर तांडा यांचे ताब्यातुन रोख रक्कम, 07 मोबाईल, कार क्र. MH-25BA-1228 व मोटार सायकल क्र. UP-32-KF-6934 व जुगाराचे साहित्य असे एकुण 8,23,110 रू. चा मुद्देमाल जप्त केला तसेच लक्ष्मी मंदिर कदेर समोर तिर्रट जुगार खेळणारे 1) तानाजी भोजु बनसोडे रा. कदेर, 2) प्रमोद हणमंत कोराळे रा. कदेर, 3) सचिन बलभिम भाले रा. कदेर, 4) संतोष राम बनसोडे रा. कदेर, 5 ) रमेश रानबा बनसोडे रा. कदेर. 6) अरूण तात्याराव बनसोडे रा. कदेर यांचे ताब्यातुन रोख रक्कम, 02 मोबाईल व जुगाराचे साहित्य असे एकुण 16060 रू. चा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरूध्द महाराष्ट्र जुगार कायदयान्वये कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
सदर अवैध धंदयाविरूध्द केलेल्या कारवाई दरम्यान दि.02 / 08 / 2025 रोजी सकाळी पोलीस ठाणे उमरगा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथे मौजे कदेर व सेवानगर तांडा कदेर येथे चालु असणारे अवैध दारू विक्री, जुगार धंदे त्वरीत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात असे निवेदन देवुन 12 तास उलटायचे आतच निवेदनकर्ते / सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद चव्हाण व आकाश दिलीप राठोड दोघे रा. सेवानगर तांडा कदेर हेच अवैधरित्या तिर्रट जुगार खेळताना पोलीसांच्या जाळयात अडकल्याने त्याबाबत गावात व परीसरात खमंग चर्चा होत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री. सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि गजानन पुजरवाड, सपोफौ / प्रदिप ओव्हळ, पोहेकॉ / 1470 कोनगुलवार, पोना / 1181 अनुरूद्र कावळे, पोकॉ / 1535 नवनाथ भोरे, पोकों / 1806 बाबासाहेब कांबळे केलेली आहे.
0 Comments