Subscribe Us

भगवान देवकते यांची शिवसेना धाराशिव जिल्हा सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती


तेरणेचा छावा/धाराशिव:-बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि शिवसेनेची लढवय्यी परंपरा जपत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार भगवान देवकते यांची धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेना सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
   भगवान देवकते हे धर्मनिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ठाणे भागातील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख असली तरी, त्यांचे मूळ गाव उमरगा तालुक्यात असून ते धाराशिव जिल्ह्याशी नातं जपणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेतून जिल्ह्यातील जनसंपर्क अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.
    या निवडीसंदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आले आहे. या पत्रानुसार, देवकते यांनी दर महिन्यात किमान दोन संपर्क दौरे करणे व त्याचा सविस्तर अहवाल बाळासाहेब भवन येथे सादर करणे आवश्यक आहे.
    या नियुक्तीबद्दल भगवान देवकते यांचे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments