तेरणेचा छावा/येरमाळा:-
प्रतिवर्षीप्रमाणे 14 एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा येथे सोमवार (दि.14 एप्रिल रोजी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
यावेळी प्रस्ताविकात बोलताना येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांनी सांगितले की आज आपण जयंतीच्या निमित्ताने फक्त हार फुले अर्पण करून चालणार नाही तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करून त्यांचे विचार आत्मसात करणे, न्याय समता, बंधुत्व, शिक्षण ही मूल्य अंगीकार करून पुढे तसाच वारसा चालवाणे ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांच्या विचारांच्या क्रांतीची दीप आजही सोबत आहे त्याला पेटवत ठेवणं ही खरी जयंती आहे. बाबासाहेबांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा अनेक जागतिक क्षेत्रात उमटवला आहे.आज आपला देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालत असून जागतिक अर्थतज्ञ,जागतिक जलतज्ञ,पत्रकार, वकील,यासह विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी आपले नाव कायमचे कोरले आहे. बाबासाहेबांनी परदेशात शिक्षण काळात हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा कधीही परिस्थिती पुढे हार न मानत वेळेप्रसंगीउपाशी पोटाने सुद्धा शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य केले. त्यामुळे आपल्या पुढे कशी ही परिस्थिती आली तर हार न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळतं. असा संदेश यावेळी डॉ. तांबारे यांनी दिला
यावेळी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणपतसिगं परदेशी केंद्राचे मॅनेजर बापूराव हुलुळे तसेच कौटुंबिक सामूपदेशिका प्रियंका शिंदे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना कोठावळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम येडाई व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी सुरज जाधव, युवराज पडवळ ,नानासाहेब देशमुख,कल्पना कोठावळे,सुदर्शन तामाने,संजय कांबळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments