Subscribe Us

घुगरी महाप्रसाने श्री येडेश्वरी देवी येरमाळा चैत्र पौर्णिमा यात्रेची सांगता.

तेरणेचा छावा/येरमाळा:- 
 'आई राजा उदो उदो'चा जयघोष करत देवीच्या पालखीची आमराई मंदिरामध्ये विधीवत महापूजा तसेच महाआरती करण्यात आली.यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने गुरुवारी (ता. १७) श्री.येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सावाची सांगता झाली.पालखी मुख्य मंदिराकडे निघालेचे पाहून महिला भाविकांचे डोळे पाणावलेले पाहून साश्रू नयननांनी पालखीला निरोप देताना दिसत होते.
गेले पाच दिवस श्री येडेश्वरी देवीची पालखी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदीरात पालखी मुक्कामी होती.पाचव्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचे आयोजन असते यानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले.
सलग पाच दिवस चालू असलेल्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.चुनाववेचण्याच्या कार्यक्रमासाठी चुन्याच्या रानात पालखी आल्यानंतर पंधरा लाखांहून अधिक संख्येने उपस्थित राहून भाविकांनी पालखी वर चुनखडी टाकली तेथून पालखी आमराई मंदिरात आल्यानंतर पालखीचा मुक्काम पाच दिवस असतो.या काळात भाविक मोठ्या संख्येने पालखीच्या दर्शनासाठी गर्दी होती. गुरुवारी यात्रेचा शेवट दिवस असल्याने भाविकांनी पालखी दर्शनासह घुगरी प्रसादासाठी गर्दी केली होती.शिवाय मनोरंजनासाठी आलेल्या व्यावसायिकांच्या स्टॉलमधील आवश्यक वस्तुं,गृहउपयोगी सामानाची खरेदी करण्यात महिला भाविक गुंतल्याचे चित्र दिसत होते.यात्रा म्हणलं की,अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते यामध्ये शुक्रवारी रात्री पंचक्रोशीतीच्या गावातील देवीच्या आराधी मंडळासाठी आराधी गाण्यांच्या स्पर्धा व शनिवारी रात्री शोभेच्या दारुची आतिषबाजी करून भाविकांचे व यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचे मनोरंजन करण्यात आले. गुरुवारी शेवटच्या दिवशी गावातील घरोघरी जाऊनरब्बी हंगामातील नवीन ज्वारी,गहू,हरभरा जमा केलेल्या धान्यातून घुगरी महाप्रसाद तयार करुन घुगरीचे वाटप केले जाते. 04:00 वाजता आमराई मंदिरात देवीच्या पालखीची आरती महापूजा करुन घुगरी महाप्रसादाचे पुजारी,मानकरी,ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घूगरी प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली.या घुगरी प्रसादासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक आले होते.
गुरुवारी पालखीचे प्रस्थान मुख्य डोंगरावरील मंदिराकडे होत असताना गावातील मुख्य चौका चौकातून जाते. पालखीच्या पाठवणीसाठी गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा शिंपून रांगोळी काढली होत्या फुलं अंथरुन,पालखीला पायघड्या घालण्यात आल्या होत्या पालखीघरासमोर आल्यानंतर पालखीच्या खांदेकरी,यांच्या पायावर पाणी वाहून चुरमुरे,लाह्या,बतासे,रेवढ्याचा प्रसाद वाहून प्रसाद वाटला. गेले पाच दिवस यात्रेच्या उत्साहाचे होते. पालखीची पाठवणी म्हणजे नववधूच्या लग्नानंतरची पाठवणी असे कांही वातावरण पालखी पाठवणीचे असते. पालखी जाताना चित्र पाहुन कांही महिला भाविकांचे डोळे पाणावलेले दिसले त्यामुळे साश्रुनयनांनी देवीच्या पालखीस भाविकांनी जडअंतःकरणाने निरोप दिला गावातून पालखी गावकुसाबाहेरील ढाशीवर आल्या नंतर ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेत सहकार्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचे आभार म्हणून शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.याशिवाय टँकर,पाणपोई,पाणी बाटली वाटप करणाऱ्या भक्तांचेही सन्मान करण्यात आले.यानंतर देवीची पालखी डोंगरवरील मुख्य मंदिराकडे रवाना झाली 

चुन्याच्या दिवशी देवीची पालखी येते तेंव्हा लाखो भाविकांनी वेचलेली चूनखडी बुधवारी (ता.१६) रात्री चुन्याच्या रानातील राशीवर गोवऱ्याच्या भट्टीत भाजन्यात आली.याभाजलेल्या चुन्याच्या राशीतील चुना वेचून पंचक्रोशीत भाविक चूनाच्या राशीवर जमा करतात.आज पालखी सोबत ही भाजलेली चुनखडी पोत्यात भरुन मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करुन बैलगाडीने मंदिराकडे नेहून रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी मंदिराला पहाटे चुन्याने रंगावण्याची प्रथा आहे.पहाटेच भाविक मंदिरात चुन्याने मंदिर सारववात.ही प्रथापूर्वापार चालत आली असून यासाठी आज आलेले भाविक मुकामी मंदिरावर राहतात तर कांहीं भाविक पहाटे मंदिराला सारवण्यासाठी येतात.त्यामुळेच चुना वेचण्याची परंपरा रूढ झाली आहे.

काळानुरूप प्रसाद स्वादिष्ट झाला
        काळानुरुप घुगरी प्रसादाचे स्वरुप स्वादिष्ठ झाले.
घुगरी महाप्रसादासाठी लागणारे धान्य गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन ज्वारी,गहु,हरभरा गोळा केला जातो आणि हे धान्य गोळा करण्याचा मान येथील वाणी समाजाचे दत्तात्रय उंबरदंड यांच्याकडे आहे आणि आजही उंबरदंड कुटुंबीय घुगरी जमा करुन शिजवुन तयार करतात.पूर्वी घुगरी ज्वारी,हरभरा,गहु,याची असायची आता भाविक घुगरी शिजवून झाल्या नंतर घुगरीवर, मनुके,बेदाणे,बदाम,काजु,साखर,गुळ टाकतात त्यामुळे घुगरी प्रसादाचे स्वरुप बदलले असुन घुगरी प्रसाद स्वादिष्ठ झाला आहे.

Post a Comment

0 Comments