महामानव,विश्वरत्न, जागतिक अर्थतज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.14 एप्रिल रोजी येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा येथे व्यसनमुक्तीचा उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या सर्व रुग्ण व कर्मचारी यांनी पुस्तक वाचून जयंती साजरी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व व्यसनाधीन व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतली की आज दिवसभर आपण झेप व्यसनमुक्तीची या पुस्तकाचे वाचन करून नवीन ज्ञान आत्मसात करून व्यसनरूपी दुश्मनाला हरवून नवीन दिशा निश्चित करून एक असे म्हणून झेप व्यसनमुक्तीची हे पुस्तक वाचून एक आगळी वेगळी जयंती साजरी केली
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. पल्लवी तांबारे या होत्या. यावेळी संचालक डॉ. संदीप तांबारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना डॉ.पल्लवी तांबारे यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय काळातील घडामोड आपल्या शब्दात मांडल्या. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या कौटुंबिक सामूपदेशिका प्रियंका शिंदे मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणपतसिंग परदेशी मॅनेजर बापूराव हुलुळे ,कल्पना कोठावळे सुरज जाधव ,युवराज पडवळ यांनी अथक परिश्रम घेतले
0 Comments