तेरणेचा छावा/कळंब:-
कळंब तालुक्यातील एकुण 92 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन 2025-2030 साठीचे आरक्षण बुधवार दि. 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता सोडत पध्दतीने काढण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी कळंब यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने कळंब तालुक्यातील एकुण 92 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन 2025-2030 साठीचे आरक्षण बुधवार दि. 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पंचायत समिती मिटींग हॉल कळंब येथे सोडत पध्दतीने काढण्यात येणार आहे.
तेंव्हा तलाठी सज्जा अंतर्गत सर्व गावातील जनतेस दंवडीद्वारे कळविण्यात यावे तसेच ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर सदर आरक्षण बाबतचे पत्र डकवून गावात जाहीर प्रसिध्द करावे व प्रसध्दी पंचनामा दिनांक. 16 एप्रिल पुर्वी या कार्यालयास सादर करावा. सदर कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे पत्र तहसीलदार कळंब यांनी तालुक्यातील सर्व तलाठी सज्जाना काढले आहेत. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या तालुक्यातील प्रतिनिधींनाही कळविण्यात आलेले आहे.
0 Comments