धाराशिव/तेरणेचा छावा:-
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ होत असलेल्या स्वच्छतागृहामुळे पवित्र असलेल्या परिसरात नाहक दुर्गंधी करण्याचे काम नगरपालिकेने करू नये. अशा प्रकारचे निवेदन शुक्रवार (दि.28 फेब्रुवारी) रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा एक अत्यंत पवित्र व मंगलमय ठिकाण आहे. या ठिकाणी नगर परिषदेच्या मार्फतून सीएसआर फंडातून स्वच्छतागृह उभारण्याची शासनाची योजना आहे.परंतु धाराशिव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक हा सर्व जनतेसाठी संस्मरणीय व गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. या ठिकाणी प्रसाधनगृह शौचालय उभे करून या चौकाचे मांगल्य व पावित्र्य भंग होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारतासाठी आदर्श आहेत. या चौकात घाण होणे दुर्गंधी पसरणे अस्वच्छ परिसर दिसणे हे शहरवासीयांसाठी निश्चितच चुकीचे ठरणार आहे. शासन प्रशासन छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रसाधनगृह उभे करून जनतेच्या असंतोषात भर टाकत आहे. संपूर्ण महाराष्ट्राची शिवछत्रपतींवर नितांत श्रद्धा आहे. अशा महत्त्वाच्या जागी व ठिकाणी नगर परिषदेने स्वच्छतागृह प्रसाधनगृह उभे करू नयेत अन्यथा शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्यावतीने सर्व समाज संघटना एकत्र येऊन शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.अशा प्रकारचे निवेदन शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे उपाध्यक्ष अमोल सिरसट, शहराध्यक्ष हनुमंत यादव, शहर उपाध्यक्ष आकाश भोसले, संतोष घोरपडे, बबलू भोईटे, योगेश आतकरे, अमोल साळुंके, ऋषिकेश काळे, दत्तात्रेय साळुंके,यांनी दिले आहे.
0 Comments