येरमाळा/तेरणेचा छावा:-
येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लहू तुकाराम बारकुल तर उपाध्यक्षपदी अजय विठ्ठल बेंद्रे तर सचिव पदी बालाजी शंकरराव बारकुल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली व येरमाळा प्रेस क्लब हा अधिकृत रीत्या धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संलग्न झाल्याबद्दल धनंजय रणदिवे यांच्याकडून सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा सदस्य कुंदन भैया कांबळे, संघटक प्रमोद पाटील, कोषाध्यक्ष सचिन पाटील, सहसचिव संदीप बारकूल, प्रसिद्धीप्रमुख नितेश बारकुल, सदस्य नागेश तोडकरी, सदस्य निलेश बारकुल मार्गदर्शक धनंजय बप्पा बारकुल, समाधान दादा बारकुल सुभाष बारकुल व इतर उपस्थित होते.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला साजेल असेच काम आमच्या सर्वांकडून होत राहील अशी ग्वाही तेरणेचा छावा शी बोलताना नवीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
0 Comments