धाराशिव/तेरणेचा छावा:-
महाविकास आघाडीचे कैलास पाटील दुसऱ्यांदा आमदार होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा कट्टर शिवसैनिक प्रशांत साळुंके यांचा 'पण' अखेर पूर्ण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत कैलास पाटील दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर आमदार पाटील यांनी स्वतः साळुंके यांना चप्पल आणून दिली. त्यानंतरच त्यांनी पायात चप्पल घातली.
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील हे दुसऱ्यांदा आमदार व्हावेत याकरिता कट्टर शिवसैनिक बापू साळुंके यांनी कैलास दादा यांचे हस्ते ठाकरे नगर नवरात्र महोत्सवात श्री येडेश्वरी देवीची महाआरती व महापूजा करुन विधानसभा निवडणुकीत कैलास पाटील विजयी होईपर्यंत आपण पायात पायथान चप्पल घालणार नसल्याचा 'पण' त्यांनी केला होता. निवडणूक निकालानंतर आमदार कैलास दादा पाटिल भरघोस मताधिक्य घेऊन विजयी झाले. आपल्या कट्टर शिवसैनिक सहकाऱ्याचा 'पण' लक्षात असल्याने आमदार कैलास दादांनी स्वतः चप्पल घेऊन देत साळुंके यांचा पण पूर्ण केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिनेश बंडगर अक्षय ढोबळे नाना घाडगे संग्राम देशमुख राहुल गवळी पदाधिकारी तसेच शिवसैनिक, शाहुनगर, अष्टविनायक चौक ठाकरे नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments