कळंब - शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे यांनी मतदारांना आवाहन केले आहे की,त्यांच्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी.
पिंगळे यांनी आश्वासन दिले की, महायुतीच्या पाठबळावर आणि आपल्या प्रयत्नांच्या जोरावर मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी ते प्रामाणिकपणे कार्य करतील.
शिवसेना महायुतीचे अजित पिंगळे यांनी कळंब-धाराशिव मतदारसंघात दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी येडशी व ढोकी गावात मतदारांशी संवाद साधला.
आपल्या प्रचार दौऱ्यात मतदारांशी संवाद साधताना सांगितले की, "महायुती सरकारच्या ठोस योजना आणि विकासाभिमुख धोरणांमुळे मतदारसंघाचा विकास वेगाने होऊ शकतो. मला संधी दिल्यास शिक्षण,आरोग्य,रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांत विशेष लक्ष देऊन मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करेन.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की,त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्यावर भर दिला जाईल. "माझे राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असून,मी कोणत्याही पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन केवळ मतदारसंघातील नागरिकांच्या भल्यासाठी काम करेन," असे पिंगळे म्हणाले.
@@ मागासलेला मतदारसंघ ही ओळख पुसून काढण्याचा निर्धार महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी मतदारांना आवाहन केले आहे की,देशात मागासलेला मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भागाचा विकास घडवून ही ओळख कायमची पुसून काढण्यासाठी त्यांना एकदा संधी द्यावी.
अजित पिंगळे म्हणाले, "आज आपल्या मतदारसंघावर मागासलेपणाचा शिक्का आहे, पण ही स्थिती बदलण्याची माझी ठाम भूमिका आहे. महायुतीच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि माझ्या विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या आधारे, मी मतदारसंघाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रगतीचे नवे पर्व घडवून आणीन."
ते पुढे म्हणाले की, "रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून मतदारसंघाच्या विकासाला गती दिली जाईल. येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, हे माझ्या प्राधान्यक्रमात आहे."
मतदारसंघातील सर्व घटकांशी संवाद साधत पिंगळे यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यावर उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. "तुमच्या विश्वासाने मला एकदा संधी दिल्यास, तुमचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन," असे ते म्हणाले.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला असून मतदारांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
महायुतीचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील या प्रचार मोहिमेसाठी पाठिंबा दर्शवला असून मतदारांना महायुतीला विजय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील,शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
0 Comments