२४१, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार
डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्या प्रचारार्थ दिनांक.१३ नोव्हेंबर २०२४ वार. बुधवार रोजी सकाळी ९ वाजता तुळजापुर मतदार संघातील बेंबळी गावात ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा व जाहीर सभा.
आरक्षण बचाव पदयात्रा खंडोबा मंदिर, बेंबळी येथुन सुरु होईल आणि समारोप खंडोबा मंदिर बेंबळी येथे सभा घेऊन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
⁃ प्राध्यापक हाके सरांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा.
241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार ओबीसींच्या नेत्या डॉ. स्नेहाताई सोनकाटे विधानसभा रिंगणात उतरल्या आहेत ओबीसी समाजाला एकत्रित करुन आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी बेंबळी येथे ओबीसी नेते तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा आयोजित केली आहे.
- " जिथ बॅनर फाडलं तिथंच पदयात्रा काढून सभा घेणार "स्नेहा सोनकाटेंच धाडसी निर्णय.
“१३ नोव्हेंबरला बेंबळी येथे सोनकाटे यांनी आरक्षण बचाव पदयात्रा आणि जाहीर सभा आयोजित केली आहे.
प्रचाराच्या सुरुवातीला ज्या बेंबळी गावात जातीवादी माकडांनी माझं बॅनर फाडल. त्याच ठिकाणी मी जातीवाद्यांना मुठमाती देणार आहे असे सोनकाटे यांनी सांगितल.
मी मतदारसंघातील सर्व जनतेला जेष्ठांना, तरुण मित्रमंडळींना, ओबीसी, एससी, एसटी, मुस्लीम बांधवांना आव्हान करते की आपण या आरक्षण बचाव पदयात्रेला आणि सभेला उपस्थित रहावं. जातीवाद संपवुन आरक्षण वाचवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सुरु असलेल्या लढ्यात आपण योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments