येरमाळा/तेरणेचा छावा:- वैद्यकीय सेवेची 40 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंद सोहळा येरमाळा येथील येडेश्वरी हॉस्पिटल येथे शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
येरमाळा येथे 40 वर्षापूर्वी कै.आनंदराव पाटील व मोहेकर गुरुजी यांच्या उपस्थितीत उपस्थितीत रुग्णसेवेला सुरुवात केली होती. डॉ. राजकुमार घुगे यांनी 25 10 1984 रोजी आपली रुग्णसेवा सुरू केली होती त्यास आज 40 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांच्या रुग्णसेवे बद्दल कौतुक होत आहे ते सध्या येरमाळा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
40 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विविध प्रकारच्या रोग, आजार , निदान, यशस्वीरित्या पार पाडले आहे . हे गरीब रुग्णासाठी वरदान ठरले असून चांगल्या व पवित्र कार्य करणाऱ्या डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन मंडळाकडून भव्य सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन येरमाळा जाफर भाई शेख व डॉक्टर असोसिएशन उपाध्यक्ष डॉक्टर देवशाला भगत उपस्थित होते
याप्रसंगी डॉ.अमित मुंडे डॉ. सचिन पवार डॉ. स्मिता भारस्कर डॉ. पल्लवी तांबारे डॉ. संदीप तांबारे उपस्थित होते तसेच या प्रसंगी सुरज वनवे काश्मीर शेख सौरभ वैरागी वैभव भारस्कर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अजेन्द्र शामकुळे यांनी केले आहे कार्यक्रमाचे शेवटी जाफर भाई शेख यांनी आभार प्रदर्शन केले आहे .
0 Comments