*श्रेयाचे मानकरी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करून मानले आभार*
*धाराशिव/तेरणेचा छावा*
मराठा संघर्ष योद्धा मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला यशाची सुरुवात मराठवाड्यातील कळंब तालुक्यातून आथर्डी या गावातून मराठा कुणबी दाखल्याच्या मानकरी होऊन पहिल्या महिला सरपंच पदाचे भाग्य कळंब तालुक्यातील आथर्डी गावातील सौ.कुसूम काकासाहेब चौधरी यांची ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड झाली. या सरपंच पदाचे सर्व श्रेय गावकऱ्यांनी व कळंब तालुक्यातील सकल मराठा समाजाने मराठा संघर्ष योद्धा मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या चरणी अर्पण केले आहे. या निवडीचे कौतुक करून मराठा संघर्ष योद्धा मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांनी सौ.कुसूम काकासाहेब चौधरी यांचा सत्कार केला व नवनियुक्त सरपंच यांनीही छत्रपती शिवरायांची प्रतिमा शाल देवून पाटलांचा सन्मान केला. यावेळी चेतन कात्रे, अतुल गायकवाड, दत्तात्रय तनपुरे, ॲड. अशोक चोंदे, शंकरचंद्र (दादा) खंडागळे, पंडित देशमुख, नितीन चौधरी, किशोर (अप्पा) पिंगळे, पांडुरंग तारक (सरपंच अंतरवली) आदी उपस्थित होते.
0 Comments