धाराशिव/ तेरणेचा छावा:-
चीन येथे होणाऱ्या जागतिक लेझर रनिंग स्पर्धेसाठी आपल्या धाराशिव येथील कन्येची निवड होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी चीन येथील स्पर्धेसाठी निवड होऊन जात आहे ही बाब सामान्य नसून या यशासाठी तिने खूप मोठा संघर्ष केला आहे.तरी यासाठी यशदा मल्टिस्टेट मुख्यशाखा धाराशिव येथे आज योगिनीला बोलवून चीन येथील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि आर्थिक मदत म्हणून नव्हे तर सामाजिक जबाबदारी समजून यशदा मल्टिस्टेट तर्फे आर्थिक मदत केली. जेणेकरून चीन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी योगिनी ला उत्तम यश भेटेल आणि धाराशिवसह देशाचे नाव उज्वल करावे ही सदिच्छा. आणि भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा.या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मा सुधीर दादा सस्ते , CEO प्रकाश गरड,सचिन लोमटे ,अभिजित लावंड ,रीतापुरे साहेब ,पंकज भिसे ,तसेच यशदा परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यशदा मल्टिस्टेट परिवारातील सर्व सदस्यांनी योगिता हिला शुभेच्छा दिल्या.
आपल्या धाराशिव मधील खेळाडूंना आर्थिक अडचणीमुळे बऱ्याचदा संधीचे सोने करता येणे अशक्य होते.अशा उत्कृष्ठ खेळाडूंच्या पाठीशी सामाजिक जबाबदारी समजून आमचा यशदा ग्रुप सदैव पाठीशी आहे. जेणेकरून आपल्या भागात जास्तीत जास्त संख्येने खेळाडू निर्माण होतील आणि धाराशिवसह देशाचे नाव जागतिक स्तरावर नेतील
0 Comments