ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत. जिल्हा पोलीस अधीक्षकांची घेतली भेट.
धाराशिव/तेरणेचा छावा:-
येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये वैभव मनोज बारकुल, वय 30 वर्षे, व्यवसाय ट्रक ड्रायव्हर, रा. नरसिंग गल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 28.05.2024 रोजी ट्रक क्र एमएच 25 एक्स 9898 सोळा चाकी वाहन ज्यामध्ये सोयाबीन डीओसी माल कळंब येथुन भरुन येरमाळा बार्शी मार्गे दोडबोलापूर कर्नाटक येथे जात होते. दरम्यान 18.30 वा. सु. येरमाळा घाटात विठाई हॉटेल जवळ आरोपी नामे- 1)कुणाल दत्ता सावंत, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, 2)प्रदीप रघुनाथ बेद्रे, रा. येरमाळा, 3) अवधुत गणेश मद्रुपकर रा. बाळे सोलापूर ह.मु. येरमाळा, 4) बालाजी ओव्हाळ, 5) प्रविण शिलवंत, 6) ओम तोरडमल, 7)गोविंद तोरडमल, 8) अर्जुन तोरडमल, 9) चैतन्य तोरडमल, रा. कडकनाथवाडी ता. वाशी, 10) दशरथ उर्फ नाना दगडू शिंदे, रा. येरमाळा, 11) अभिषेक आप्पा सुरवसे, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी 12) संदीप उर्फ विकी सोमनाथ चव्हाण, रा तेरखेडा ता. वाशी यांनी वैभव बारकुल यांच्या ट्रकला मोटरसायकल लावून आडवून उलट्या कोयत्याने मारहाण करुन सोबत असलेल्या क्लिनरला काठीने मारहाण करुन फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील 79,000₹ काढून घेतले. अशा मजकुराच्या वैभव बारकुल यांनी दि. 29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 395, 341, सह 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
*ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद*
संजय बाबा बारकुल, 2) शरद बारकुल, 3) मनोज बारकुल, 4) विकास बारकुल, 5) नटराज बारकुल, 6) प्रितेश बारकुल, 7) गणेश पवार सर्व रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.05.2024 रोजी 22.30 ते 23.00 वा. सु. येरमाळा बसस्थानक जवळ फिर्यादी नामे- वैशाली सुनिल शिलवंत, वय 38 वर्षे, रा. कडकनाथवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांना व यांच्या सोबतच्या महिला यांना नमुद आरोपींनी पोलीसा ठाणे येरमाळा येथे का गेलात असा जाब विचारले असता फिर्यादीने आमचे मुलावर खोटी केस का करता असे विचारण्याचे कारणावरून नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन तुमच्या मुलावर मोठी कलमे लावतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैशाली शिलवंत यांनी दि.29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 504, 506 सह अ.जा.ज.अ.प्र कायदा कलम 3(1)(आर) 3(1) (एस), 3(2) (व्ही.ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अशाप्रकारे ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद झाल्यानंतर येरमाळा ग्रामस्थांनी एकत्र येत गाव बंद ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत चर्चा केली त्यावर पोलीस अधीक्षकांनी कोणावरही अन्याय न होता चौकशी करूनच पूर्णपणे कारवाई करणार असल्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले
0 Comments