कळम तालुक्यातील प्रकार
धाराशिव/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील आंदोरा येथील तलाठी यांनी एका शेतकऱ्याकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई करून कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की कल्याण शामराव राठोड, वय-43 वर्षे, धंदा-नोकरी, पद-तलाठी, सज्जा आंदोरा, अतिरिक्त कार्यभार- सज्जा ईटकुर, तालुका कळंब जिल्हा-धाराशीव याने
यातील तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी घेतलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून यातील आलोसे कल्याण शामराव राठोड वय 43 वर्षे याने दिनांक 14/05/2024 रोजी तक्रारदार यांचेकडे 4000/- रु. लाच रकमेची मागणी करून तरजोडीअंती 3000/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तलाठी यास ताब्यात घेण्यात आले आहे.
या सापळ्यासाठी -मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .
यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा
अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव
सापळा पथक - पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर. यांनी सहभाग नोंदवून सापळा यशस्वी केला
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
कार्यालय 02472 222879*
टोल फ्री क्रमांक.1064
0 Comments