Subscribe Us

एन.व्हि.पी शुगर चाचणी गळीत हंगाम सांगता समारंभ..

धाराशिव/तेरणेचा छावा:-
एन.व्हि.पी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम सन २०२३-२४ चा १ लाख १२ हजार मे.टन उच्चांकी यशस्वी गाळप पुर्ण करून सांगता समारोप करण्यात आला.
एन.व्हि.पी शुगर करखाण्याचा सांगता समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक मा.श्री.आप्पासाहेब पाटील, चेअरमन मा.श्री.बालाजी उर्फ नानासाहेब पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, तोडणी-वाहतूक ठेकेदार,कर्मचारी यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 एन.व्ही.पी शुगर कारखान्यास ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, तोडणी ठेकेदार, चालक, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्य मुळे कमी कालावधीत १ लाख १२ हजार मे.टन उच्चांकी यशस्वी गाळप करू शकलोत. शेतकऱ्यांना गाळप सुरु झाल्यापासून ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांत संबंधित शेतकर्‍याच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. 
ऊस वाहतूकीमध्ये प्रथम, दुतीय व तृतीय क्रमांक काढले. यामध्ये प्रथम क्रमांक श्री.बालाजी छत्रभुज बुकन, (२७८६ मे टन), दुतीय क्रमांक श्री.भजनदास लाला जमाले, (२४०६ मे टन), तृतीय क्रमांक श्री.गोरोबा मधुकर रोटे  (२११२ मे टन), तसेच डबल मिनी मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण मोकिंदा गडदे  (२२३४ मे टन), दुतीय क्रमांक पिंटू बन्सी काळे  (१८६३ मे टन), तृतीय क्रमांक श्री.एकनाथ लिंबाजी गडदे  (१७९७ मे टन), हार्वेस्टिंग मालक श्री. शिवानंद दळवी, श्री.बलभीम बुकन, दस्तगिर सय्यद या सर्व वाहतूक ठेकेदारांचा बक्षिस देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 
एन.व्हि.पी शुगर कारखान्याचे चालू ०१ ते १५ मार्च या कालावधीतील गाळपास आलेल्या ऊसाचे २८००/- प्रमाणे बिल दि.१६ मार्च २०२४ रोजी बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक आणि ऊस तोडणी कामगार आणि विशेषतः कारखान्याच्या प्रशासनावर विश्वास ठेऊन आपला ऊस कारखान्याला घालणारे माझे ऊस उत्पादक शेतकरी बांधव या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार...!

Post a Comment

0 Comments