Subscribe Us

65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण दिमाखदार सोहळ्यात संपन्न



लाखोची बक्षीसे
 - पहिले बक्षीस - महिंद्रा स्कॉपियो 
- दुसरे बक्षीस - महिंद्रा ट्रॅक्टर
सुवर्ण पदक विजेत्यास- 20 - बुलेट तर रौप्य पदक विजेत्यास 20 शाईन मोटारसायकल वाटप
 धाराशिव/तेरणेचा छावा:- :महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन दि. 16 ते 20  नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आले होते . या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा
         स्वस्तिक मंगल कार्यालय येथे पार पडला.
    या सोहळ्यापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता शिवराज राक्षे व उपविजेता हर्षवर्धन सदगीर यांची धाराशिव नगरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली , या जंगी मिरवणूकीचे चौका - चौकात भव्य स्वागत करण्यात आले .
       प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपले प्रास्ताविक व्यक्त करताना या कुस्ती स्पर्धेचे यशस्वीपणे  आयोजन कसे केले व या कुस्ती खेळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या .
    सर्व  मान्यवरांनी आपल्या मनोगतात आयोजक सुधीर पाटील तथा युवानेते अभिराम पाटील यांचे या यशस्वी स्पर्धेसाठी आभार मानून विशेष कौतुक केले .
     या सोहळ्याला धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर , अर्जून वीर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार , महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव वामनराव गीते , राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष  महेंद्र धुरगुडे तर शरद पवार गटाचे  जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर , भाजपा राज्य कार्यकरणी सदस्य बसवराज मंगरूळे , विनोद गपाट , सतीश बप्पा देशमुख , राज्य बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड मिलिंद पाटील , हनमंत मडके , काकासाहेब सांळुखे , नवनाथ जगताप , युवराज राक्षे , किरण मोरे , नगर सेवक सोमनाथ गुरव , डॉ . चंद्रजित जाधव ,सिद्धी विनायक ग्रुपचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी संस्थेचे सरचिटणीस  प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .
     या स्पर्धेत राज्यभरातील 950 कुस्तीगीरांनी भाग नोंदवला होता तर 500 पंचांनी या स्पर्धेचे काम पाहिले होते . माती आणि गादी या दोन गटात प्रत्येकी 10 अशा 20 प्रमुख लढतीतून महाराष्ट्राचा 65 वा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरला , त्याने हर्षवर्धन सदगीरला पराभूत केले .
    या 65 व्या महाराष्ट्र केसरीचा विजेता नांदेडाचा शिवराज राक्षे याला महिंद्रा स्कॉर्पियो तर उपविजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांना महिंद्रा ट्रॅक्टरचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले .
          या स्पर्धेतील 20 गटातील विजेत्यांना पारितोषिक म्हणून बुलेट व शाईन गाड्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.
       या स्पर्धेचे नियोजन युवा नेते अभिराम पाटील यांनी केले होते तर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शना खाली झालेल्या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद राज्यभरातील क्रीडा शौकिकांनी दिला होता .
      या बक्षीस वितरण सोहळ्याला जिल्हयातील सर्व च क्षेत्रातील मान्यवर मंडळी , संस्थेतील सर्व शाखेचे प्राचार्य , पर्यवेक्षक  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments