Subscribe Us

रेल्वे मार्ग जमीन भूसंपादन कमी किंमतीतील खरेदी थांबवा.अन्यथा आंदोलन करण्याचा दुधगावकर यांचा इशारा

  धाराशिव/तेरणेचा छावा:-
  सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी जमीनीचे भुसंपादन थेट खरेदीने न करता कमी किंमतीमध्ये खरेदी करण्यात येत आहे. ते थांबवून शेतकºयांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे शनिवारी (दि.१३) निवेदनाद्वारे केली आहे.
महोदय,
   या निवेदनात सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मागार्साठी जमीनीचे भुसंपादन थेट खरेदीने न करता कमी किंमतीमध्ये खरेदी करण्यात येत असून ते थांबवून शेतकºयांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे असताना असे न होता रेल्वेच्या नियमानुसार त्याभागातील तीन वषार्तील सवार्धीत दराने खरेदी केलेले खरेदीखत निश्चित करणे अपेक्षीत असताना नगररचनाकार व प्रशासन यांनी कांही जास्तीच्या किंमतीचे दस्तावेज बाजूला ठेवून भूसंपादनाचा दर निश्चित केला. त्यामुळे सांजा उपळा या भागातील शेतकºयांना एकरी २५ लक्ष तर भातंब्रा गावातील शेतकºयांना ४० हजार रुपये एकर दर निश्चित केला असून हे शेतकºयावर अन्याय करणारे आहे. तरी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन शेतकºयांना भुसंपादनासाठी राज्यातील इतर ठिकाणी दिलेल्या दरानुसार जमीनीचे भुसंपादन करण्यात यावे, अन्यथा या विरोधात रेल्वे प्रशासन, महसूल प्रशासन, नगररचनाकार यांच्यासह सर्व संबंधीता विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी व सर्व संबंधीतांना या संदर्भात भुसंपादन दराच्या दुरुस्त्या करण्यासंदर्भात आदेशीत करावे ही विनंती. श्री दुधगावकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments