Subscribe Us

27 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद


धाराशिव /तेरणेचा छावा:
 27 वर्षापासून फरार असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील व सध्या सोलापूर येथे वास्तव्यास असलेला आरोपी कुंभकर्ण उर्फ अब्दुल्ला पवार वय 55 वर्ष राहणार जळकोटवाडी हल्ली मुक्काम मोमीन नगर सोलापूर येथे वास्तव्यात होता, याला मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी गुप्त मिळालेल्या माहितीनुसार शितापीने अटक केली आहे याच्या नावावर जबरी घरपोळ्या, मारहाण दुखापत करणे अशा प्रकारचे मुरूम व लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होते.
       या सराईत गुन्हेगाराची  गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून त्यास अतिशय शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन  त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट्स पोलीस ठाणे मुरूम येथे हजर केले. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश पवार पोहेकॉ 1166 हुसेन सय्यद, पोना 1569 अमोल चव्हाण ,पोहेका 1248 अरब यांनी ही कामगिरी पार पाडली अमोल चव्हाण यांना ही गोपनीय माहिती मिळाली होती
  त्यामुळे पोलीस खात्याने मनावर घेतले तर काय होते याची ही चुणूक बघायला मिळत आहे, या अशा प्रकारच्या कामगिरीमुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments