Subscribe Us

350 वा शिवराज्याभिषेक बोधचिन्ह शासकीय कार्यालयामध्ये लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव/ तेरणेचा छावा:-
350 वा शिवराज्याभिषेक निमित्त शिवकालीन मंगलचिन्हे आणि महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष 
बोधचिन्हाचे पत्र व्यवहारात वापर करणे तसेच सदर बोधचिन्हाचे शासकीय कार्यालयामध्ये दर्शनी भागामध्ये चित्र फोटो फ्रेम लावण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 8221/प्र.क. 459/ हा.का.4  मंत्रालय मुंबई दिनांक 24 जुलै 2023 अन्वये शासन आदेश पारित झालेला आहे.राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रचार प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्र व्यवहारात सदर बोधचिन्हाचा कटाक्षाने वापर करण्याचा आदेश झालेला होता.परंतु सदर आदेशाचे बहुसंख्य कार्यालयांमध्ये पालन होताना दिसून येत नव्हते.यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सदर बोधचिन्हांचे वापराबाबत तसेच फोटो फ्रेम बाबत विस्तीर्ण असे निवेदन देण्यात आले.यामध्ये शासन निर्णय तसेच बोधचिन्हाची प्रत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने सर्व विभागांना आदेश काढणे बाबत सकारात्मकता दर्शवली.यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी,शशिकांत खुने,जयराज खोचरे,आकाश कोकाटे, संतोष घोरपडे, अॅड. संजय शिंदे, अच्युत थोरात मेजर,विष्णू यमपुरे,दत्तात्रय साळुंके,योगेश आतकरे इत्यादी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते .

Post a Comment

0 Comments