धाराशिव /तेरणेचा छावा:-
.धाराशिव शहरांतील बसस्थानकात गेल्या अनेक वर्षापासून मोठे मोठे खड्डे पडले होते प्रवाशांच्या मागणी नुसार एस टी महामंडळाने गेल्या आठ दिवसा पूर्वी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले सदर करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून परत मोठे मोठे खड्डे पडले आहेत निकृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना ई-मेल द्वारे दिले आहे
यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की खड्डे बुजवण्याचे काम करताना फक्त खडी टाकून त्यावर माती मिश्रित मुरूम टाकलेला आहे त्यामुळे काम झाल्यानंतर पहिल्याच पावसात सर्व खडी आणि मुरूम वाहून गेला असल्याने पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे या कामावर जवळपास चार ते साडेचार लाख रुपये एसटी महामंडळाने खर्च केला आहे कामावर नियंत्रण ठेवणारे विभागीय अभियंता श्री उबाळे आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप करत बसस्थानकामधील गटारी बंद झालेल्या आहेत तसेच बाजूच्या हॉटेलमधील डेनेजचे पाणी बसस्थानकामधील गटारीमध्ये सोडले आहे त्यामुळे पाऊस आल्यानंतर डेनेज चे पाणी बसस्थानकामध्ये शिरते गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर प्रवाशी हे बस स्थानकामध्ये येणाऱ्या मार्गावर पडल्याले आहेत अशी गंभीर परिस्थिती असताना आगार प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष नाही निकृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी व गुत्तेदार यांची तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करावी अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
0 Comments