Subscribe Us

मलकापूर ग्रामपंचायतचा अजब कारभार, गामपंचायतचे सिक्के सह्या असलेले कोरे लेटरहेड तिराईत इसमाच्या स्वाधीन!

           (संग्रहित चित्र) 
येरमाळा /तेरणेचा छावा;- महिला भाविकाचा विनयभंग प्रकरणात राज्यभर चर्चेत आलेल्या मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांनी पूर्वी झालेल्या विकास कमावराच पुन्हा निधी मंजूर करुन राज्यशासनाला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सदरील प्रकरणात ग्रामपंचायतीचा कागदपत्रांचा गाव विकास साठी निधी आणतो म्हणून एकनाथ लोमटे यांनी गैर वापर केल्याचे पंचायत समिती चौकशीत उघडकीस आले आहे.
        या प्रकरणात मिळालेली माहिती अशी की,राज्यभरात जडी बुटी देवून असाध्य आजार बरे करणारे तसेच संतती प्राप्ती साठी प्रसिध्द श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थानचे (ता.कळंब) गेल्या वर्षी जुलै महिन्यात महिला भाविकाच्या विनय भंगाच्या प्रकरणात अटक झालेले एकनाथ लोमटे महाराज यांनी ग्रामपंचायत प्रशासनास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयालयाच्या शिफारस पत्रावरुन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मार्च एंडच्या विकास कामाच्या गडबडीत मलकापूर येथील ग्रामपंचायतचे कोरे कागद पत्रांचा गैर वापर करुन जुन्याच झालेल्या विकास कामावर नव्याने एक कोटी दहा लाख निधी मंजूर करुन आणला होता.सदरील प्रकार ग्राम पंचायत च्या निदर्शनास आल्या नंतर ग्रामपंचायतने संबंधित विभागाला निधी रद्द करण्याचे पत्र दिले.आणि दत्त मंदिर संस्थान मठ परिसरातील कामे रद्द करण्यात आली आहेत.
     सदरील प्रकरणात कागद पत्र देणारे ग्राम पंचायतचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक यांची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्यात यावी म्हणून मलकापूरचे ग्रामस्थ सुंदर लोमटे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अर्जाच्या चौकशीत ग्रामपंचायत कडून माझ्या मंत्रालयात ओळखी आहेत.गावातील विकास कामासाठी मार्च एंड वर तत्काळ निधी आणतो म्हणून सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक यांच्या सह्यांचे कोरे लेटर हेड वापरुन, बनावट कागदपत्रांचा गैर वापर करुन  झालेल्या कामावर पुन्हा निधी मंजूर करुन आणल्याचे पंचायत समिती चौकशी अहवालातून समोर आले आहे .त्यानुसार निधी मंजूर करुन आणणाऱ्या दत्त मंदिर संस्थानचे एकनाथ लोमटे महाराज यानी राज्य शासनाला एक कोटी दहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सदरील निधी रद्द करण्यात आला असला तरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या चौकशी अहवालानुसार संबंधितावर गुन्हे नोंद करण्यात यावे म्हणून सुंदर लोमटे यांनी येरमाळा पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.

... सुंदर लोमटे यांनी दिलेल्या चौकशी तक्रारी नंतर सदरील प्रकरणात पंचायत समिती चौकशी अहवाला नुसार त्यावेळी पदावर कार्यरत नसलेल्या उपसरपंच सुधीर पायाळे यांच्या सह्या असूनही त्यांची चौकशी करण्यात आलेली नाही.चौकशी होऊन पंधरा दिवस झाले तरी पंचायत समिती,पोलिस प्रशासन दोषींना एकमेकांच्या कारवाई आदेशाचे कारण काढून पाठीशी घालत असल्याचे दिसते.वास्तविक पंचायत समितीच्या अहवाला नुसार तक्रारी नंतर दोषींवर गुन्हे नोंद व्हायला हवे होते.मात्र अद्याप दोषींवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
      या बाबत गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर व चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी तुकाराम जाधव,ग्रामसेवक दीपक वेदपाठक यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणा बाबत विचारले असता मीटिंग मध्ये आहोत.पाच मिनिटात फोन करतो असे म्हणत बोलणे टाळले.तर एकनाथ लोमटे यांनी अनेकवेळा  फोन करुनही फोन घेतला नाही.
     मलकापूर ग्राम पंचायतचे सरपंच रुक्मिणी अगतराव घोळवे यांनी बोलताना सांगितले की, एकनाथ लोमटे महाराजांनी गावात विकास कामे आणतो,माझ्या मंत्रालयात ओळखी आहेत म्हणून ग्रामपंचायची कोरी कागद पत्रे सह्या सिक्के घेऊन त्याचा दुरुपयोग करुन मंदिर संस्थान साठी जुन्याच झालेल्या विकास कामावर निधी मंजूर करुन आणला.सदरील प्रकार लक्षात येताच जिल्हा नियोजन समितीला पत्र देवुन निधी रद्द केला आहे.
    सदरील प्रकरणाच्या पंचायत समिती चौकशीत दोषींवर गुन्हे नोंद झाले नसल्या बाबत सपोनी  अतुल पाटील यांना संपर्क साधला असता.सुंदर लोमटे यांच्या तक्रारी वरुन सदरील प्रकरणाची चौकशी करुन पंचायत समितीला चौकशी अहवाल देण्यात आला आहे दोषींवर कारवाईचा निर्णय गट विकास अधिकारी यांनी घ्यायचा आहे असे त्यांनी सांगितले.
.   या प्रकरणी पंचायत समिती,पोलिसात तक्रार देणारे मलकापूर ग्रामस्थ सुंदर लोमटे यांनी बोलताना सांगितले की या प्रकरणाच्या पंचायत समिती चौकशीत सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,एकनाथ लोमटे महाराज दोषी असल्याचे समोर आले असूनही दोषींवर गुन्हे दाखल  झाले नाहीत तर १५ ऑगस्ट रोजी कळंब पंचायत समिती समोर आपण आमरण उपोषणाला बसणार आहे.

Post a Comment

0 Comments