पुतळ्यासमोर साकडे
धाराशिव /तेरणेचा छावा: -
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांसह सर्वसामान्य नागरिकांची भाजप सरकारकडून मोठी पिळवणूक केली आहे. जिल्ह्यावर सातत्याने संकटे चालू आहेतत, मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वच मंत्रिमंडळ बेफिकीर वागत आहेत. महाराज आपण प्रजेच्या हितासाठी शेतकरी, शेतमजूर यांना संकटात मदत केली. त्यांना संरक्षण दिले, मात्र आज तुमच्या धोरणाच्या विरोधात तुमच्या नावाने या सरकारकडून मताचा जोगवा मागितला जात आहे. त्यासाठी महाराज या सरकारला सद्बुध्दी द्यावी, या मागणीसाठी राष्टÑवादी कॉंग्रेसच्या वतीने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आनोखे आंदोलन करुन सोमवारी (दि.१०) दुपारी ३ वाजता महाराजांकडे साकडे घालण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माजी आ. राहुल मोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पुर्वीप्रमाणे दुधाचे दर ठेवावे, दुधाला एफआरपी हमीभाव कायदा तयार करावा व गायीच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर निश्चित करावा, सन २०२२ चा पिकविमा शेतकºयांना सरसकट त्वरीत वाटप करावा, सततच्या पावसाचे अनुदान महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यांना वाटप झाले, परंतू धाराशिव जिल्ह्यास वाटप झाले, इतर जिल्ह्यास १३५०० रुपये प्रमाणे वाटप झाले, परंतू जिल्ह्यात ८५०० रुपये वाटप झाले. हा जिल्ह्यावर अन्याय आहे. महात्मा फुले अनुदान योजनेचे ५० हजार रुपये जिल्ह्यातील ५० टक्के शेतकºयांना अजून मिळाले नाहीत, ते त्वरीत वाटप करावेत, कांदा उत्पादक शेतकºयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही ते त्वरीत द्यावे, ११ एप्रिल २०२२ रोजी गारपीठग्रस्त भागास मुख्यमंत्र्यांनी भेट देवून आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले, मात्र ते अद्याप मिळालेले नाही. टेंभर्णी-लातूर महामार्गाचे काम त्वरीत चालू करावे, येडेश्वरी मंदिर ते बार्शीरोड साडेतीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण त्वरी मंजूर करुन काम चालू करावे या मागण्यांसाठी दुपारी ३ वाजता राष्टÑवादीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
पुढील दहा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, ज्येष्ठ नेते संपतराव डोके, प्रतापसिंह पाटील, महेंद्र धूरगुडे, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन मधुकरराव मोटे, जिल्ह्याचे नेते संजय कांबळे, नितीन बागल, वाजिद पठाण, कादर खान, सतीश एखंडे, हबीब खान पठाण, अनिल शिंदे, मझहर शेरेकर, रोहित बागल, नितीन बिक्कड, तालुकाध्यक्ष संजय पवार, श्याम घोगरे, श्रीधर भवर, हनुमंत पाटोळे, धैर्यशील पाटील, दिलीप घोलप, रंजना भोजने, शहराध्यक्ष अयाज शेख, मुसद्दीक काझी, रमेश मस्कर, महबूब शेख, प्रमोद वीर, नाना जमदाडे, जयंत देशमुख दशरथ माने, बलभीम गरड, नितीन चव्हाण, दौलत गाढवे, जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, मनीषा पाटील, राहुल बनसोडे, अविनाश तांबारे, विशाल शिंगाडे, प्रदीप डोके, असदखान पठाण,अमोल पाटील, सतीश घोडेराव, अशोक नलावडे, महेश नलावडे, मनोज मुदगल, अमरसिंह देशमुख, रमेश देशमुख, संदीप गगने, संतोष पवार, धनंजय पाटील, तात्याराव माशाळ, विश्राम घुगे, वसंत धोंगडे, दत्तात्रेय माळी, दीपक माळी, दत्तात्रेय पवार, रणवीर इंगळे, पंकज भोसले, सोन्ने पाटील, अविनाश देशमुख, अभिजीत काळे, रवी ठेंगळ, अभिजीत काळे, श्वेता दूरुगकर, सुरेखा जाधव, रंजना भोजने, बालाश्री पवार, अप्सरा पठाण, ज्योती माळाळे, प्रतीक माने, बाबा मुजावर, मलंग शेख, गुणवंत पवार, तुषार वाघमारे, प्रवीण लाडुळकर, समाधान माने, शोभा मस्के, राजकुमार पवार, रंजीत वर्पे, तेजेस भालेराव, बिलाल तांबोळी, मृत्युंजय बनसोडे, अन्वर शेख, प्रेमचंद मुंडे, शरद जगदाळे, तोफिक शेख, उमेश मडके, बाळासाहेब कणसे, शिवशांत काकडे, औदुंबर पाटील, राजपाल दुधभाते, सईद काझी, विठ्ठलसिंग राजपूत, सौरभ देशमुख, रंजीत बारकुल, जगदीश सुरवशे, मलंग शेख, महेश कदम, विलास वीर, नारायण तूरूप, अमोल शेळके, शिवाजी सावंत, भागवत भांडारकर तसेच जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शरद पवार राष्ट्रवादी प्रेमी आदींसह आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments