Subscribe Us

बिअर बार परमिट रूम रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण


धाराशिव/तेरणेचा छावा:- तुळजापूर तालुक्यातील कसई येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेऊन तेथे बिअर बार परमिट रूम करण्यास परवानगी दिली असा खोटा ठराव दाखवून दिशाभूल केली आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कसेही येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१७ मे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील कसई येथे बिअर बार सुरू करण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव घेतला नसताना घेतला असल्याचे धाराशिव येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास दाखविले आहे. याबाबत तक्रार केली असता विस्तार अधिकारी कावळे यांनी गावात येऊन जबाब घेऊन त्यामध्ये दि. २५ ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये ग्रामसभा झाली असल्याचे दाखविले आहे. परंतू राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी खोटी ग्रामसभा दाखवून कागदपत्र दाखल केलेली आहेत. गट विकास अधिकाऱ्यांनी दि. २८ मार्च २०२३ रोजी अहवाल पाठविलेला आहे. तर दि. १९ एप्रिल रोजी कसई येथील ग्रामस्थ व तथा शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र सुरवसे हे आत्मदहन करणार होतो. परंतू संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी ४ वेळेस दिल्यामुळे ते टाळले. आश्वासन देऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे दि.१७ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महेंद्र सुरवसे, उपसरपंच सुप्रिया हिप्परकर, ग्रामपंचायत सदस्य संगीता पात्रे, कुंडलिक भोवाळ, राम भोवाळ, दीपक हिप्परकर, प्रदीप पात्रे, नितीन शिंदे, विकास कांबळे, सुनील पात्रे व इतर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. 
     दरम्यान जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि. १९ एप्रिल रोजी संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. तर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दि.१५ मे रोजी तुळजापूर गट विकास अधिकारी यांना संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल करून उपोषणकर्ते यांना उपोषणापासून परावर्त करावे असे कळविले आहे. मात्र कारवाई करण्यास गटविकास अधिकारी टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामस्थांनी समोरून उपोषणाचा मार्ग अवलंबिवलीला आहे.

Post a Comment

0 Comments