धाराशिव /तेरणेचा छावा:-
डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील डी. फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्याकरिता मा. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शैक्षणिक संकुलातील लेखा अधिकारी योगेश मंडलिक व भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक शितल केदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना शितल केदार यांनी स्वत:च्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळेतील आठवणींना उजाळा देत, औषध निर्माणशास्त्र क्षेत्रातील भविष्यातील शिक्षण व उपलब्ध असणार्या विविध रोजगाराच्या संधी याबाबत माहिती दिली.
तर योगेश मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यश संपादन करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
डी. फार्म प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांकडून द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती, अभ्यास, परीक्षेत प्राप्त झालेले गुण तसेच विविध स्पर्धांमधील सहभाग यातून निवडक विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत मुलांमधून अरबाज मोमीन व मुलींमधून अश्विनी वाघमारे ह्या विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत “स्टुडेंट ऑफ द ईयर” हा पुरस्कार शितल केदार व विभागप्रमुख सुबोध कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थी चैतन्य ढालगडे, निकिता शिनगारे, आदित्य मटे व अंजली अपुणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता शैक्षणिक समन्वयक प्रा. सिद्धि बसाटे, महाविद्यालयातील शिक्षक प्रा. तनुजा थिटे, प्रा. ऋतिका पाटील, प्रा. आकांक्षा काळे, प्रा. ऋतुजा अंबेकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अभिरुद्र सुतार, प्रवीण चेंडगे, श्रीमती गाडे व डी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments