Subscribe Us

पथकाने तपास केलेल्या गावापैकी 19 गावात एकही कामगार आढळलाच नाही


धाराशिव /तेरणेचा छावा:-

बांधकाम कामगारांना मध्यान भोजन जिल्ह्यातील 894 साइटवर बांधकाम कामगाराला पुरवले जात आहे त्यासाठी 88 साइटवर जाऊन तपासणी समितीच्या पथकाने प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहणी करून भेटी देऊन खातरजमा केली असता तब्बल 19 साइटवर एक देखील बांधकाम कामगार आढळून आला नाही मात्र या साइटवरील 1093 कामगारांना भोजन पुरवठा केला असल्याचा कागदपत्रे मेळ लावलेला आहे विशेष म्हणजे हे फक्त तपासणी केल्या 88 साइटवरील सत्यता पडताळणी समोर आले आहे तर उर्वरित 806 वर काय परिस्थिती असेल  याता याचा अंदाज नक्कीच येईल. त्यामुळे या योजनेत किती बेबनाव असून नेमके ही योजना कोणासाठी चालू आहे असा सवाल खऱ्या कामगार वर्गातून  एकावयास येत आहे.  
    कामगाराला फक्त वरण-भातच
 मध्यान भोजन योजनेतील बांधकाम कामगारांना  6 रोटी ,250  ग्रॅम सुकी भाजी ,250 ग्रॅम पातळ भाजी ,20 ग्रॅम गूळ, 2 हिरव्या मिरच्या, 40 ग्रॅम लोणचे व 40 ग्रॅम सालाड असे अन्नपदार्थ  भोजन म्हणून देणे आवश्यक व बंधनकारक आहे मात्र परंडा तालुक्यातील वाकडी येथील समृद्धी एंटरप्राइजेस वीटभट्टी, पारदवाडी येथील लोहकर वीट भट्टी व सुनील बोबडे वीट भट्टी येथील कामगारांना फक्त वरण-भात दिला जात असल्याचा  तक्रारीही लाभार्थ्यांनी तपासणी समितीच्या अध्यक्ष व सदस्य समोर मांडले आहेत 
नेमका भोजन पुरवठा कोणाला
उस्मानाबाद तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे 201 कामगार दाखविली असून त्यापैकी 11 कामगार आढळून आले ते देखील स्वतःच्या शेतात काम करताना तर सांगवी, नरसिंह मंदिर सांगवी, दाऊतपुर .,राजवीर कंट्रक्शन दाऊतपुर येथील वयोवृद्ध व शेतकरी, जागजी धुता, नेहरूनगर व पाणी टाकी धुत्ता, जागीरदारवाडी, शौकत कोतवाल धाराशिव, इर्ला येथील शेतमजूर   भोजनाचा  पुरवठा केला जातो मात्र शासनाच्या नियमानुसार फक्त बांधकाम कामगार मुजरांना जेवण पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले असताना शासनाच्या अटी नियम व शेतीचे उल्लंघन करून योजना पुरवण्याचे काम संबंधित कंपनीकडून केले जात आहे. 
 
कामगारांना भोजनपुरवठा नसतानाही बिले  अदा! 
बांधकाम कामगार कामगारांना दोन टाईम जेवण पुरवठा करणे बंधनकारक असताना परंडा तालुक्यातील सोनारी व वाशी तालुक्यातील पार्टी फाटा येथील वीट उद्योगावरील कामगारांना गेल्या वर्षभरापासून मध्यान भोजन पुरवले गेलेले नाही तर भीम नगर परंडा येथे 9 महिन्यापासून व कवठे भीम नगर येथे एक महिन्यापासून बंद आहे तसेच वाकडी येथे एक महिन्यापासून जेवणाची गाडी आलेली नाही तर असू येते पंधरा दिवसापासून भोजन बंद आहे तसेच तेरखेडा व वाशी येथे भोजनच वितरित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे व या कालावधीतील भोजन बंद असताना त्यांचे बिल अदा केले गेले कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

कामगार कामासाठी बाहेरगावी असताना भोजन त्यांच्या गावात. 
मध्यान भोजन योजनेतील काम करीत असलेल्या मजुरांना काम करत असलेल्या ठिकाणी गरजेचे आहे मात्र उमरगा तालुक्यातील मूळ तांडा जेके तर उन्हाळी लोहारा तालुक्यातील बेडकळ परंडा तालुक्यातील आसू येथील कामगार उमरगा व इतर ठिकाणी बांधकामास कामासाठी जात आहेत मात्र त्यांना मध्यान भोजन त्यांच्या गावी पुरवठा केला जात असल्याचे योजनेत दाखविली आहे

समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मध्यान्न भोजन पुरवठा करण्यात येत असलेल्या जिल्हाधिकारी समितीच्या 88 गावाला भेटी देऊन प्रत्यक्ष पाणी केली या गावात 1093 लाभार्थी दाखवून  बिल उचलले गेले व जात आहे मात्र 19 गावात एकही कामगाराची उपस्थिती दिसून आली नाही त्यामध्ये धाराशिव तालुक्यातील वाघोली गांधी चौक 90 ,महादेव वाडी 193,टाकळी बेंबळी (भिमाई नगर ) 30 ,साठे नगर 30 होळकर नगर 30 अहिल्यानगर 30 जागजी जि प शाळा 120 तर तुळजापूर तालुक्यातील स्टोन क्रेशर काक्रंबा 19, कणे वीट  उत्पादक तुळजापूर 48 ,लोहारा तालुक्यातील जुनी मागणी 94,मोगा खुर्द 60 तसेच परंडा तालुक्यातील कल्याण वीट उद्योग परंडा 15 सोनारी वीट उद्योग सोनारी 15 ,भीम नगर कवठे 73 ढकपिंपरी 30 ,भीम नगर परंडा 36 ,तर वाशी तालुक्यातील  परडी फाटा येथील विकास कुकडे वीट उद्योग 75,सुबोध विद्यालय तेरखेडा 35 अतीश सहदेव सेंटरिंग  मिस्त्री 30 या ठिकाणचा समावेश आहे मात्र या ठिकाणी एकही कामगार नसल्याचे या ठिकाणी भोजन घेऊन जाणारी गाडी फिरलीच नाही कामगार नसताना देखील वरील दाखवलेली आकडेवारीनुसार शासनाकडून बिले अदा केली जात आहे.

Post a Comment

0 Comments