Subscribe Us

राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक विंगची बांधणी मजबूत करण्याचे संदीप काळे यांचे साप्ताहिक विंगच्या ऑनलाईन बैठकीत आवाहन.


 तेरणेचा छावा धाराशिव:-   राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक विंगची बांधणी मजबूत करा, असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. त्यांनी साप्ताहिक विंगच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन (ता.22)केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले यांच्यासह साप्ताहिक विंगचे राज्यकार्यकारिणीतील सर्व  पदाधिकारी, विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष हेदेखिल उपस्थित होते.
        संदीप काळे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये साप्ताहिक विंगचा एक जिल्हाध्यक्ष पाहिजे. यासोबतच, सर्वच  जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारिणीत 21 पदाधिकारी हवेत. त्यानंतर तालुक्याची कार्यकारिणी गठीत करावी. तसेच, प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची आठवड्यांतून एक दिवस ऑनलाइन मीटिंग व्हायलाच पाहिजे. काही सकारात्मक उपक्रम राबवायचे असल्यास फादर बॉडीच्या जिल्हाध्यक्षांना विचारात घेऊन ते पार पाडावे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला साप्ताहिक विंगचे अधिवेशन घ्यावे, अशी सूचनादेखिल त्यांनी केली. येत्या 2 किंवा 3 मे रोजी ऑनलाइन मीटिंग घेऊयात असेही ते म्हणाले.
      यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले की, साप्ताहिक विंगचे संघटन मजबूत होणे, ही आपली पहिली पायरी आहे. म्हणून अत्यंत सकारात्मकतेने संघटन बांधणी करा. साप्ताहिक विंग राज्याच्या कोनाकोपऱ्यात न्या. प्रत्येक बाबीची डेटलाईन ठरवा. साप्ताहिक विंगचे सर्वजण एकत्र आले, की  कामाला प्रचंड गती येईल. टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्न सुटतील.
     याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे म्हणाले, की राज्यातील साप्ताहिक विंगची बांधणी येत्या 15 मे पर्यंत पूर्ण केली जाईल. विभागीय अध्यक्षांसह सर्व जिल्ह्यांची कार्यकारिणी गठीत केली जाईल. यासाठी सर्वजण एकदिलाने काम करतील, असेही ते म्हणाले.

दहा मुख्य प्रश्नांसाठी चार जणांची समिती गठीत

साप्ताहिकच्या मालक-संपादकांना भेडसावत असेलेले दहा मुख्य प्रश्न शोधण्यासाठी चार जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष राजू पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन, प्रदेश सरचिटणीस वामन पाठक, वाशीम जिल्हाध्यक्ष संदीप पिंपरकर यांचा समावेश आहे. या बैठकीला राज्यकार्यकारिणीत पदाधिकारी अन् अनेक जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. त्या सर्वांनी ऑनलाइन मीटिंगमध्ये मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments