Subscribe Us

व्हाईस ऑफ मीडिया च्या डिजिटल मीडिया विभाग धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी वैभव पारवे यांची निवड


धाराशिव/ तेरणेचा छावा:-
           देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया ह्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विभागाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी वैभव पारवे यांची निवड करण्यात आली आहे.
   आजच्या घडीला झटपट अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी न्यूज पोर्टल  व यूट्यूब न्यूज चॅनल याकडे प्रामुख्याने पाहिले जाते. एका क्लिकवर राज्यातील त्याचबरोबर देश-विदेशातील बातम्या प्रत्येकाच्या मोबाईल वरती झळकत असतात. क्षणाक्षणाची ताजी अपडेट पोहोचवण्याचे काम न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल करत असतात. प्रत्येक मिनिटाला अपडेट होणाऱ्या जगात बातम्यांचे माध्यमं देखील अपडेटेड होऊ लागली आहेत.त्यामुळे प्रसार माध्यमांच्या बरोबरच न्यूज पोर्टल व युट्युब चॅनल देखील वाचक व दर्षकांपर्यंत बातम्या पोहचवत असते.त्यामुळेच सर्वांची पसंती न्यूज पोर्टल व चॅनल ला मिळू लागली आहे.
      वैभव पारवे यांची निवड व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व डिजिटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांच्या मार्फत निवडीचे पत्र देण्यात आले.
   व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव पारवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व पत्रकार व मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments