Subscribe Us

अवैध धंदे बंद करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण- अमजद सय्यद


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
उस्मानाबाद शहरातील इंदिरा नगर परिसरामध्ये मागील अनेक वर्षापासून राजरोसपणे अवैध सुरू आहेत याची पोलिसांना माहिती असूनही कसलीही दखल घेतली जात नाही इंदिरा नगर भागामध्ये मटका, जुगार, अवैध गुटखा विक्री,  गावठी दारू विक्री, शिंदी, गांजा विक्री, राजरोसपणे खुलेआम सुरू असून याच्यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करून गोरगरीब लोकांचे उध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी या भागामधील दहा ते वीस मटक्याचे अवैध दुकाने (मटक्याचे दरपत्रक)लाऊन खुलेआम सुरू आहेत,
 या ठिकाणी दररोज मटक्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून यामुळे अनेक लोकांचे संसार रस्त्यावर आले आहेत अनेक लोकांचे संसार मोडले आहेत अनेक लोकांना गाव सोडून जाण्याची वेळ आलेली आहे येथील गावठी दारू पिल्यामुळे अनेक लोकांना विषबाधा झाली असून अनेक लोक मयत झाले आहेत,तसेच उस्मानाबाद शहरातअनेक ठिकाणी मटका टपरीवर उघडपणे घेतला जातो याकडे पोलीस प्रशासनधुळे  कशासाठी डोळेझाक  करत आहेत याची नागरिकाला जाणीव असल्याची कुजबुज जनतेतून एक आवाज येत आहे  
   याची संपूर्ण माहिती अमजद सय्यद यांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, तसेच याची प्रत पोलिस महा निरीक्षक  औरंगाबाद परिक्षेत्र,  गृहमंत्री तथा उप मुख्यमंत्री , राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे इंदिरा नगर परिसरात सुरू असलेले अवैध धंदे दहा दिवसात बंद न झाल्यास 12 फेब्रुवारी 2023 पासून अमजद सय्यद हे पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन पोलिस अधीक्षक यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments