Subscribe Us

प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर. हजेरी मस्टरवर पुढच्या दिवशीची हजरी स्वाक्षरी



प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिकाम्या खुर्चीचा केला सत्कार
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच आरोग्याची बेफिकिरी

दहिफळ / तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे.गावातील रुग्णांची तक्रारी ऐकून सरपंच चरणेश्वर पाटील यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.१० वाजले तरी कर्मचारी डाॅक्टर हजर नव्हते.हजेरी मस्टर बघीतले तर रजेवर असलेल्या व्यक्तींनी पुढच्या दिवसाची स्वाक्षरी करून ठेवलेली आढळून आले.यावरून नेमका कारभार कसा चालतो हे लक्षात आले.वरिष्टांना फोन करून चर्चा केली.
अनेक रुग्ण उपचारासाठी बसलेले होते.
गावातील प्रवीण पाटील हे आजारी असल्यामुळे दवाखान्यात आले होते तेव्हा सावळा गोंधळ आढळून आला.गावातील रूग्णांसाठी दवाखाना आहे.वेळेवर उपचार होत नसतील तर उपयोग काय.वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन  करावी. सरकार लोकांसाठी लाखो रुपये खर्च करते.कर्मचारी यांनी ही जाणीव ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी.अन्यथा आम्ही तिव्र आंदोलन छेडु.असा इशारा दिला आहे.यावेळी सरपंच व ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीवर रोपटे  ठेवून प्रशासनाचा  निषेध व्यक्त केला.
       प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्ययंत्रना ढेपाळलेली आहे कारण कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी जर आठ आठ दिवस आरोग्य केंद्रात फिरकत नसतील तर दवाखान्याची काय अवस्था होऊ शकते.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत हे रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना अचानक भेटी देऊन कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देताना दिसून येतात परंतु खुद्द जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा इतकी बेफिकीर कशासाठी झाली आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.अशा कामचोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरआरोग्य मंत्री जिल्हाप्रशासन काही कारवाई करतील का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे..यंत्रणात लवकर सुधारणा न झाल्यास ग्रामस्थ आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे 
        ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून गावात मोठा दवाखाना सुरू केला.जुन्या जेष्ठ मंडळींनी एकत्र येऊन दवाखाना सुरू केला.आज मोठी इमारत उभी आहे परंतु लोकांना सुविधा मिळत नाही.
अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु गांभीर्याने विचार केलेला नाही.प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा दवाखान्याला कुलुप ठोकू.
नागरिक-फुलचंद पाटील.

Post a Comment

0 Comments