Subscribe Us

कसबे तडवळे येथील शिबिरात 51 जणांचे रक्तदान


जिओलाईफ फाउंडेशन, संजयकुमार डाळे यांचा उपक्रम, लाहोटी यांच्या स्मरणार्थ शिबीर
उस्मानाबाद/तेरणेचा छावा:- तालुक्यातील कसबे तडवळे येथे जिओ लाईफ फाउंडेशन व संजयकुमार डाळे यांच्या वतीने स्वर्गीय ओमप्रकाश लाहोटी यांच्या स्मरणारर्थ गुरुवारी (दि.19) रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 51 युवकांनी रक्तदान केले. रक्तदानाचे हे सहाव्या वर्ष आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व स्वर्गीय ओमप्रकाश लाहोटी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सचिन देशमुख तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर हे होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत कसबे तडवळा गावचे उपसरपंच प्रताप करंजकर, बाबासाहेब चव्हाण, तुकाराम शिरसट यांनी केले.
    याप्रसंगी युवा नेते विशाल जमाले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील वळेकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष धनके, बाळासाहेब थोडसरे, लहू शिंदे, गणेश जाधव, महादेव जाधव, लखन कदम, हनुमंत पवार, बाळासाहेब करंजकर, प्रदीप नाईकनवरे, आलम कोतवाल, रुपेश चौधरी, भरत भालेकर, गणेश घोडके, अनिल बिक्कड, विलास राठोड, श्री मोहिते आदींची उपस्थिती होती. यावेळी सुनील वळेकर, संजय बहिर्मुख, अभिजीत मडके, कृष्णा पांचाळ, श्यामसुंदर जावळे, सुनील गुंड, गणेश घोडके, भारत भालेकर, सोमनाथ होगले, रोहित शेंडगे, प्रवीण पवा, वैभव काळे, दिपक काळे, अनिल बिक्कड आदींची उपस्थिती होती. सदरील शिबीर हे उस्मानाबाद येथील सह्याद्री ब्लड बँकेच्या वतीने घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments