Subscribe Us

विद्यानिकेतनच्या विज्ञान प्रयोगाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड.


विद्यानिकेतनने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनमध्ये पटकवला प्रथम क्रमांक

उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
       कळंब तालुक्यातील येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा येथील विद्यार्थिनी  कल्याणी जगन्नाथ डोके व सोनल बालाजी काळे,राजेश्वरी पंडित या विद्यार्थ्यांनी बनवलेला पर्यावरणास अनुकूल साहित्य  या प्रयोगाचा 49 व्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला आहे.या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे सदर विद्यार्थ्यास विज्ञान शिक्षक  योगेश कापसे  यांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या माध्यमिक विभागाचे विलास टेकाळे , सचिन शिंदे ,सुशेन पाटील , समाधान बाराते  उषा दिडवळ मॅडम अमृता कुलकर्णी मॅडम, बनसोडे मॅडम या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले सर्वांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दत्तात्रय पाटील  यांनी केले शाळेने मिळवलेल्या या उत्तुंग भरारी यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments