Subscribe Us

जिल्ह्यातील 20 शिक्षकांना धनेश्वरी शिक्षण समूहाचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर.


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
       शिक्षक दिनाचे औचित्य साधून धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील धनेश्वरी शिक्षण समूहाने जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.168 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्याची छाननी प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, प्राचार्य डॉ.गाजी शेख,प्राचार्य अमर कवडे,डी.फार्मसी विभागप्रमुख प्रा.सुबोध कांबळे, प्राचार्य क्रांतीकुमार पाटील,अध्यापक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर.आर.लोमटे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय समन्वयक हरी घाडगे, आयटीआय कॉलेजचे व्यवस्थापकीय समन्वयक दत्तात्रय घावटे यांनी केली.
        उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण, क्रीडा,संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या 20 शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुरस्कार जाहीर केले आहेत.
      या पुरस्काराचे वितरण 21 सप्टेंबर पूर्वी होणार असल्याचे देखील सांगितले आहे.धनेश्वरी शिक्षण समूहाने  घोषित केलेले धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढील प्रमाणे 
वरीष्ठ स्तरातून
प्रा.डॉ.दादाराव गुंडरे( शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब) प्राचार्य जगदीश गवळी (साई संगणक शास्त्र महाविद्यालय रांजणी),माध्यमिक स्तरातून भास्कर खडबडे (जिल्हा परिषद प्रशाला पळसप),सोपान पवार (विद्याभवन हायस्कूल,कळंब) सचिन छबिले (छत्रपती विद्यालय वाशी),डॉ.मीनाक्षी शिंदे (सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब),रत्नाकर पाटील (विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळा शिंगोली),महेंद्र बागडे(जिल्हा परिषद प्रशाला जवळा (नि).ता. परंडा),अलीम शेख (बाणगंगा हायस्कूल,भूम)प्राथमिक स्तरातून संजीवन तांबे(जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,आष्टा),सुखदेव भालेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी ता. तुळजापूर) गोविंद घारगे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्रवाडी ता.लोहारा), हनमंत पडवळ (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव(ज)ता.जि.उस्मानाबाद) अशोक ठोंबळ(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळाई ता.कळंब),राजेंद्र बिक्कड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी ता. कळंब),संगीता भांडवले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कवडेवाडी ता.वाशी),शबाना शेख(जिल्हा परिषद (उर्दू) प्राथमिक शाळा,येडशी)विशेष शिक्षक म्हणून प्रणिता मिटकर(एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा,यमगरवाडी ता. तुळजापूर) तर विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी गेल्या 18 वर्षापासून काम करणाऱ्या सौ.राजश्री देशमुख(अथर्व युसीमास अबॅकस सेंटर,कळंब)यांनाही धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
       तसेच मतिमंद व एचआयव्ही मुलांच पालन पोषण करणारे व शिक्षण देणारे शहाजी चव्हाण यांना धनेश्वरी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
       याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय,येरमाळा या शाळेंचा विशेष गौरव होणार आहे.
     सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक,शाळा व संस्थाचालक यांचे माजी कुलगुरु डॉ.वेदप्रकाश पाटील,धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,आमदार डॉ.राहुल पाटील  व उपाध्यक्ष डॉ.उदयसिंह पाटील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments