Subscribe Us

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येरमाळा मेळाव्यात उमेदच्या महिला स्वयंसहाय्यता गटांना 22 लाख वाटप.


     
  तेरणेचा छावा/येरमाळा :- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कळंब व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या  येरमाळा प्रभागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येरमाळा यांच्या मार्फत मा. आर व्ही चकोर गट विकास अधिकारी पंचायत समिती कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली  दि .27 डिसेंबर 2021 रोजी बँक कर्ज मेळावा घेण्यात आला सदरील मेळाव्यामध्ये बँक शाखा व्यवस्थापक मा. शरद वाठोरे सर, फिल्ड ऑफिसर अविनाश खिल्लारे सर. मा. वाठोरे सर यांनी गावातील महिला स्वयंसहाय्यता गटांना मार्गदर्शन करण्यात आले ते म्हणाले कि उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिला ह्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत व त्या आर्थिक सक्षम होणे आवश्यक आहे तसेच ते म्हणाले कि सदर कर्जाच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त शाश्वत उपजीविकेचे साधने उभा करावीत व आपले आर्थिक उत्पन्नात वाढ करावी जेणे करून बँक कर्ज परतफेड करता येईल. उमेद महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून एक आर्थिक सुबलता निर्माण केली आहे  हे नियमित पणे घेतलेले कर्ज परतफेड करतात त्यामुळे  आमच्या शाखे मार्फत जास्तीत जास्त गटांना बँक कर्ज देण्यात येणार आहे व शासनाच्या ज्या विविध विमा योजना आहेत त्या जास्तीत जास्त महिलांनी विमा काढावा असे आव्हान केले.
सदरील मेळाव्यात 12 समूहांना प्रति समूह 1 लाख रु 5 समूहाला 2 लाख रु असे मिळून 22 लाख रु वाटप करण्यात आले 
सदर कार्यक्रमात मा खांडेकर सर  यांनी महिलांना मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन प्रभाग समन्वयक सुनीता जगताप यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेरीका मीरा तोडकरी,गंगाताई जाधवर, रत्नमाला लोमटे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच बँकेतील डांगे सर व नंदू सर यांनीही सहकार्य केले.गटातील महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments