Subscribe Us

JAP मसाले कंपनीचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न.


दहिफळ/तेरणेचा छावा:-
   वाणेवाडी तालुका कळंब येथे YPCL चे JAP मसाले कंपनीचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीधर बाबा भवर  यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून येडाई प्रोडूसर कंपनी च्या संचालिका सौ सुमन तांबारे  कळंब पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती  भगवान ओव्हाळ जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ता प्रशिक्षण विभागाचेप्रदेश उपाध्यक्ष प्रा तुषार वाघमारे, ॲडव्होकेट प्रवीण यादव अभयसिंह  जाधवर, सुहास बारकुल, सरपंच विशाल पाचभाई व मान्यवरांची उपस्थिती होती. 
वानेवाडी या छोट्याशा गावातून मसाले उद्योग कंपनी स्थापन करून तरुण पिढी पुढेआदर्श निर्माण केल्याचे यावेळी मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा तुषार वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रवी शेळके यांनी केले.

Post a Comment

0 Comments