Subscribe Us

ग्रामीण कलाकारांना प्रशिक्षणाची गरज-सिनेअभिनेते सोमनाथ तडवळकर......... तेरणा काठची पोरं मराठी वेबसीरीज कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न....


दहिफळ/तेरणेचा छावा:-
       कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामीण कलाकारांनी एकत्र येऊन तेरणा काठची पोरं मराठी वेबसीरीज सुरू केली असून या वेबसिरीजच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते सोमनाथ तडवळकर यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर पालकर,प्रा.तुषार वाघमारे , कलाकार शाम शितोळे, उपस्थित होते तर कार्मक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच चरणेश्वर पाटील हे होते.यावेळी गावातील नाट्यकलाकार आवर्जुन उपस्थित होते.उदघाटन प्रसंगी कलाकारांना मार्गदर्शन करताना तडवकर म्हणाले की, ग्रामीण भागातील जीवन वेबसिरीजच्या माध्यमातून पाहिला मिळत आहे.गावाकडील भाषा,घटना,परिसर, व्यक्तीरेखा यांची सांगड घालून तेरणा काठची पोरं ही मराठी वेबसीरीज नावारुपाला येत आहे.अगदी झीरो बजेट मध्ये मोबाईल वर शुट करून समाजातील विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले आहे.
या कलाकारांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे.समाजातील उद्योगपती, नेते मंडळींनी पुढे होऊन हातभार लावला पाहिजे तरच आपली ग्रामीण भागातील कला जिवंत राहणार आहे.
दहिफळ हे नाट्य कलाकारांचे गाव आहे.नाटके बंद झाली मात्र कलाकार जिवंत आहेत.त्यांनी पुन्हा नव्याने वेबसिरीजच्या माध्यमातून कला सादर करण्यासाठी कंबर कसली आहे.त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी
योगराज पांचाळ यांनी वेबसीरीज सुरू केले आहे. ही वेबसीरीज महाराष्ट्रात गाजत आहे.
ग्रामीण कलाकारांना मोठ्या पडद्यावर संधी मिळत नाही.काळानुसार खुप बदल झाला आहे.या स्पर्धेच्या युगात ग्रामीण कला लोप पावत चालली आहे.ही कला टिकवण्यासाठी वेबसिरीज हे माध्यम फाईद्याचे व महत्वाचे ठरत आहे.नक्कीच गावातील कलाकारांना या माध्यमातून चित्रपट, मालिकेत काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.गावाकडील कलाकारांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.ब-याच गोष्टी त्यांना माहीत नसतात.कॅमेरा समोर बोलत असताना ब-याच चुका होतात.पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घटत जातात.व्यक्तीरेखा साकारताना.अभिनय चुकला की भुमिका पडते.पुन्हा संधी भेटत नाही.कलाकार नाराज होतो.प्रत्येक कलाकार नावारुपाला येईल.असे नाही.परंतु संधी मिळाली तर तो स्टार होऊ शकतो.ग्रामीण कलाकारांना अभिनय क्षेत्रात काम करायचं असेल तर.त्याला अभिनय क्षेत्रातील प्रशिक्षण महत्वाचे आहे.त्यासाठी मी पुढाकार घेणार आहे.आपल्या मातीतील कलाकार चमकावा यासाठी लवकरच प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार आहे असे सोमनाथ तडवळकर म्हणाले.
यावेळी प्रा.तुषार वाघमारे, परमेश्वर पालकर, मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषण चरणेश्वर पाटील यांनी केले.खास कार्यक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे, गणेश भातलवंडे, कलाकार प्रभाकर ढवळे, फुलचंद काकडे, शिवाजी मते, वसंत मते, गणेश मते,देवीदास भातलवंडे, ईस्माईल शेख, चंद्रकांत जोगदंड,पवन हावळे, फुलचंद पाटील, श्रीराम मते,बालकलाकार सोहम ढवळे,कृष्णा पांचाळ, पत्रकार पांडुरंग मते, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी,हुकमत मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगराज पांचाळ यांनी केले.तर सुत्रसंचलन बालाजी भातलवंडे, आभार प्रदर्शन प्रशांत जाधवर यांनी केले.

Post a Comment

2 Comments

  1. ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात ही आनंदाची गोष्ट आहे ग्रामीण मुलांच्या कलेला वाव मिळेल आणि भविष्यात हीच मुले मोठे स्टार होतील, या उपक्रमास आमच्या हार्दिक शुभेच्छा!! मोबाईल वर बनवलेली वेब सिरीज नक्कीच यश मिळवून देईल,तुमचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, पुढील यशासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete